विकास निधीचे समान वितरण होत नसून निधी वाटपात पक्षपात होत आहे. सरकारमध्ये राष्ट्रवादीला झुकते माप मिळते. त्यामुळे विकास निधीवर राष्ट्रवादीने डल्ला मारला, असं काँग्रेस आमदारांचं म्हणणं आहे. त्याविरोधात उपोषणाला बसण्याचा इशारा काँग्रेसच्या ११ आमदारांनी दिला आहे. शिवसेनेचं मुखपत्र दैनिक ”च्या अग्रलेखातून काँग्रेस आमदारांच्या या भूमिकेचा समाचार घेण्यात आला आहे. ‘काँग्रेसचे आमदार उपोषणाला बसणार असतील तर तो काँग्रेसचा प्रश्न आहे. त्यांच्या या भूमिकेमुळं विरोधकांना हाती आयते कोलीत मिळणार आहे. शिवाय, काँगेस नेतृत्वासमोरील अडचण वाढणार आहे, ही जाणीव शिवसेनेनं काँग्रेसच्या आमदारांना करून दिली आहे. तसंच, काँग्रेस राष्ट्रवादीवर पक्षपाताचा आरोप करत असेल तर अर्थमंत्री अजित पवार त्यावर उत्तर देतील, असं म्हणत शिवसेनेनं या वादापासून हात झटकले आहेत.
वाचा:
‘देशाची स्थिती तशी बरी नाही. खुद्द राष्ट्रीय काँगेस पक्षात अनेक कारणांनी अस्थिरता व अस्वस्थता आहे. संसदीय लोकशाही व्यवस्थेत सक्रिय विरोधी पक्षाची तितकीच गरज असते. काँगेसने अशा मजबूत विरोधी पक्षाची भूमिका बजावायला हवी अशी मागणी होत असताना सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारण्याऐवजी काँगेसचे आमदार स्वतःच सहभागी असलेल्या सरकारविरोधात उपोषणाला बसत आहेत. ही लोकशाही वगैरे आहे, पण त्यामुळे ज्यांनी सरकार स्थापन करण्यास परवानगी दिली त्या सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यावरच अविश्वास व्यक्त केल्यासारखे होईल,’ असंही अग्रलेखात नमूद करण्यात आलं आहे. ‘बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, नितीन राऊत हे काँग्रेसमधील व सरकारमधील अनुभवी व समंजस नेते आहेत. विकास निधीच्या समान वाटपाचा विषय असेल किंवा इतर काही प्रश्न असतील तर आमदारांनी ते आपापल्या नेत्यांकडेच मांडायला हवेत,’ असंही शिवसेनेनं म्हटलं आहे.
वाचा:
‘राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्षे चालेल याविषयी कुणाच्या मनात शंका असण्याचे कारण नाही. आघाडीचे सरकार चालवणे ही एक कला आहे. त्यात ही नुसती आघाडी नसून महाविकास आघाडी आहे. त्यामुळे थोडे इकडे तिकडे होणारच. पण, हा पेच सोडवण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे समर्थ आहेत, असा विश्वासही शेवटी व्यक्त करण्यात आला आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times
I used to be able to find good info from your blog posts.
I like this website very much, Its a very nice office to read and incur information.
These are actually great ideas in concerning blogging.
Thank you ever so for you article post.
Like!! I blog frequently and I really thank you for your content. The article has truly peaked my interest.