धुळे: आज दुपारी बुलढाणावरून धुळ्याला जाणाऱ्या बसमध्ये जळगाव येथून धुळे आगारात बस चालक असलेले प्रभाकर बाजीराव पारधी हे बसले होते. त्यांना जळगाव ते धुळे दरम्यान असलेल्या मुकटी या गावी जायचे होते. परंतु ही बस मुकटी येथे न थांबविल्याने तसेच या बसला मूकटी या गावाचा थांबा नसल्याने चालकाने बस येथे थांबवली नाही. त्यामुळे प्रभाकर बाजीराव पारधी यांना राग आला.
वंदे भारतवर बाप-लेकाकडून दगडफेक; पोलिसांनी पकडताच धक्कादायक सत्य समोर, नेमकं काय घडलं?
त्यांनी फोनवरून गावातील पंधरा ते वीस तरुणांना बुलढाणा आगाराच्या बसवर दगडफेक करून या बसचे काचा फोडण्याचे सांगितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, धुळे आगाराच्या या पारधी नामक चालकाने बस मधूनच फोन केल्याचा व्हिडिओ बुलढाणा-धुळे बसच्या वाहकाने तयार केला. धुळे येथे पोहोचल्यावर बुलढाणा आगाराच्या वाहकाने चालकाची तक्रार देखील धुळे बस स्थानकात केली आहे.

एसटी कर्मचाऱ्याला धावत्या बसमध्ये अचानक भोवळ; बसचं मोठं नुकसान

यामुळे मात्र बुलढाणा आगाराच्या या बस चालक आणि वाहकात वाद निर्माण झाला. एसटीचा बस चालकच एसटीवर दगडफेक करून काचा फोडण्याचे फर्मान देत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. प्रभाकर बाजीराव पारधी या धुळे आगाराच्या बस चालकावर विभाग नियंत्रक विजय गिते यांनी तात्काळ आदेश देऊन निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here