संशयित इस्लामिक दहशतवाद्यांनी सोमवारी दक्षिण फिलिपीन्समधील एका शहरात घडवलेल्या दोन बॉम्बस्फोटांमध्ये १४ जण मृत्युमुखी पडले, तर सुमारे ७५ सैनिक, पोलिस आणि नागरिक जखमी झाले. मृतांमध्ये प्रामुख्याने सैनिकांचा समावेश आहे. फिलिपीन्समध्ये झालेला या वर्षातील हा सर्वाधिक भीषण आहे. आयएस या दहशतवादी संघटनेशी संबंधित असलेल्या बंडखोरांकडून हल्ला होण्याचा धोका असल्याने अतिरिक्त कडक सुरक्षा व्यवस्था असतानाही हा हल्ला झाल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.
एकीकडे फिलिपीन्सचे सरकार करोना साथीच्या भीषण संसर्गाला तोंड देत असतानाच, दक्षिण फिलिपीन्समधील सुलू प्रांतातील जोलो शहरात हे दोन्ही बॉम्बस्फोट घडवण्यात आले. पहिला दहशतवादी हल्ला दुपारच्या सुमारास करण्यात आला. येथील एक किराणा दुकान व कम्प्युटर दुकानासमोर उभ्या करण्यात आलेल्या दोन लष्करी ट्रकजवळ एका मोटरसायकलवर बसवण्यात आलेल्या बॉम्बचा स्फोट झाला. सैनिक खरेदीसाठी आले असताना वाहनात ठेवलेल्या स्फोटकांचा स्फोट घडवण्यात आला. मृत व जखमींमधील बहुसंख्य हे याच स्फोटातील आहेत.
वाचा:
दुसरा बॉम्बस्फोट इथून जवळच सुमारे तासाभराने झाला. हा स्फोट आत्मघातकी महिला दहशतवाद्याने घडविला. ही दहशतवादी एका नाश्त्याच्या दुकानातून बाहेर पडल्यानंतर रोमन कॅथलिक कॅथेड्रलच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेल्या सैनिकांजवळ गेली आणि तिने स्वत:ला स्फोटाने उडवून दिले. त्यात तिच्यासह एक सैनिक आणि एक पोलिस ठार झाला, तर अनेकजण जखमी झाल्याची माहिती लष्कराने दिली. या बॉम्बस्फोटांमध्ये आणखी एक सैनिक मृत्युमुखी पडल्याचे लष्कराचे प्रवक्ता ले. जन. रोनाल्ड मातेओ यांनी सांगितले. मात्र त्यांनी अधिक माहिती देण्यास नकार दिला.
वाचा: वाचा:
तिसरा बॉम्ब एका सार्वजनिक बाजारपेठेत सापडला. त्यानंतर जोलो शहरात सैन्य आणि पोलिसांनी तातडीने सुरक्षा लॉकडाउन लागू केला. या बॉम्बस्फोटांची जबाबदारी कोणत्याही दहशतवादी संघटनेने घेतली नसल्याचे लष्कराने सांगितले. मात्र यामागे अबु सय्यफ या आयएसशी संबंधित दहशतवादी गटाचा हात असल्याचा संशय लष्कराने व्यक्त केला आहे. दरम्यान, जोलो शहरात अल्पसंख्य मुस्लिमांचे प्राबल्य असून गेल्या अनेक दशकांपासून हे दुर्गम बेट मुस्लिम फुटीरतावाद्यांमुळे अशांत आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times
Very good article! We are linking to this particularly great content on our site. Keep up the great writing.
Thanks for fantastic info I was looking for this info for my mission.
Thanks so much for the blog post.
These are actually great ideas in concerning blogging.
Like!! Really appreciate you sharing this blog post.Really thank you! Keep writing.