मुंबई : वस्तू आणि सेवा कराची दिलासादायक आकडेवारीने सुखावून गेलेल्या गुंतवणूकदारांनी सलग दुसऱ्या दिवशी खरेदीचा ओघ कायम ठेवला आहे. त्यामुळे सेन्सेक्स आणि निफ्टीची घोडदौड कायम आहे. सध्या मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १०९ अंकांच्या वाढीसह ३८९०८ अंकांवर आहे. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा ३३ अंकांनी वधारून ११४९९ अंकावर ट्रेड करत आहे.

बँका आणि वित्त संस्थांच्या शेअर्सला बाजारात मागणी आहे. इंडसइंड बँक, बजाज फायनान्स,एसबीआय , बजाज फिनसर्व्ह, आयसीआयसीआय बँक, कोटक बँक, एचडीएफसी, ऍक्सिस बँक, महिंद्रा , एशियन पेंट्स, रिलायन्स, सन फार्मा, टाटा स्टील या शेअरमध्ये वाढ झाली आहे. इन्फोसिस, टीसीएस, एचसीएल टेक, पॉवरग्रीड, ओएनजीसी, नेस्ले आदी शेअरमध्ये घसरण झाली आहे.

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी देशांतर्गत शेअर बाजार वरच्या पातळीवर बंद झाले. बाजार उघडताच मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक (सेन्सेक्स) आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) अनुक्रमे १३२ अंकांनी आणि ४० अंकांनी वरच्या पातळीवर उघडले. सत्रांतर्गत व्यवहारादरम्यान सेन्सेक्सने ४६०.२२ अंकांची आणि निफ्टीने १२५.६५ अंकांची उसळी घेतली. सत्रांतर्गत व्यवहारांच्या शेवटी सेन्सेक्स ३६४.३६ अंकांनी वधारून ३८,७९९.०८च्या पातळीवर आणि निफ्टी ९४.८५ अंकांनी वधारून ११,४६६.४५च्या पातळीवर स्थिरावला होता .

तत्पूर्वी शुक्रवारी सेन्सेक्स २१४.३३ अंकांनी ३८,४३४.७२ अंकांवर आणि निफ्टी ५९.४० अंकांनी वधारून ११,३७१.६०च्या पातळीवर स्थिरावला. सोमवारी सत्रांतर्गत व्यवहारांदरम्यान झी एन्टरटेन्मेंटचा समभाग चार टक्क्यांनी वरच्या पातळीवर गेला. या शिवाय कोटक महिंद्र बँक, इंड्सइंड बँक, एचडीएफसी बँक आणि बजाज फायनान्स आदी कंपन्यांचे समभागही वरच्या पातळीवर बंद झाले. पॉवरग्रीड, महिंद्र अँड महिंद्र, ग्रासीम, हिंदाल्को आणि अदानी पोर्ट आदी कंपन्यांचे समभाग खालच्या पातळीवर स्थिरावले.

वाचा :
सोमवारी जगभरच्या बाजारांमध्ये वाढ पाहण्यास मिळाली. अमेरिकी बाजार डाउ जोन्स ०.६९ टक्क्यांच्या वाढीने २७,९३०.३०च्या पातळीवर बंद झाला. याशिवाय नॅस्डॅकही ७८ अंकांनी वधारून ११,५५५.२०च्या पातळीवर स्थिरावला. त्याचवेळी एस अँड पीही ११.६५ अंकांनी वधारून ३,३९७.१६च्या पातळीवर बंद झाला.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here