सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर : मुंबई येथून अकोल्याला कुरिअरची वाहतूक करणाऱ्या पिकअप आणि ट्रकचा दौलताबाद माळीवाडा येथील समृध्दी महामार्गावर भीषण अपघात झाला. या अपघातात पिकअप चालक गंभीर जखमी झाला असून क्लिनरचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना काल बुधवारी पहाटे ४ वजेच्या सुमारास घडली.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, विजयकुमार रणजित डागी (वय ५०, रा. झारखंड), असं मयत झालेल्या क्लिनरचं नाव आहे. तर दिपू कुमार डांगी वय३१ रा.झारखंड असे जखमी चालकाचे नाव आहे. कुरिअर वाहतूक करणारी पिकअप एमएच २७ बीएक्स ७६४१ ही मुंबई येथून अकोल्याच्या दिशेने कुरिअरची वाहतूक करण्यासाठी मंगळवार दि.११ रात्री अकरा वाजता निघाले.

Cabinet Expansion: एकनाथ शिंदेंची इच्छा अपूर्ण राहणार, या कारणामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार पावसाळी अधिवेशनानंतर?
दौलताबाद येथील माळीवाडा येथे समृध्दी महामार्गावर जात असताना समोर असलेल्या ट्रकने लेन बदलला यामुळे पाठीमागून येणाऱ्या पिकअप चालकाचे नियंत्रण सुटले आणि पिकअप पाठीमागून ट्रकला धडकली. यात पिकपचा समोरच्या भागाचा अक्षरश: चुराडा झाला. यात क्लिनर विजयकुमार गंभीर जखमी झाला.तर चालक दिपुला जबर मार लागला होता. अपघातानंतर अज्ञात ट्रक चालक घटनास्थळावरून पसार झाला दरम्यान पिकप मधील दोन्ही जखमींना तात्काळ घाटी रुग्णाला दाखल करण्यात आला.

डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू

जखमींना तात्काळ घाटी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. उपचार सुरू असताना घाटी रुग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे विजयकुमार याचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी वेळेवर उपचार दिले नसल्याचा आरोप विजयकुमारच्या नातेवाईकांनी केला आहे. डॉक्टरांनी वेळेवर उपचार केले असते तर विजयचा जीव वाचला असता, असं देखील नातेवाईकांनी म्हटलं आहे.

गुड न्यूज,गणेशोत्सवासाठी मुंबईतून कोकणात जाणाऱ्यांसाठी मोठी बातमी, कशेडी बोगद्यातील सिंगल लेनबाबत नवी अपडेट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here