नवी दिल्ली: काँग्रेस कार्यकारिणी बैठकीत सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांची पुन्हा हंगामी अध्यक्षपदावर नियुक्ती करण्यात आल्यानंतर ज्या नेत्यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहिले त्या G-२३ नेत्यांपैकी काही प्रमुख नेत्यांनी राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद () यांच्या निवासस्थानी रात्री उशिरा बैठक घेतली. या बैठकीनंतर काँग्रेसमधील बंडखोरीचा ज्वालामुखी अजूनही शांत झालेला नाही का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

सोनियांच्या नियुक्तीनंतर पत्र लिहिणाऱ्या नेत्यांची बैठक

सोनिया गांधी यांची पक्षाच्या हंगामी अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर कपिल सिब्बल (), शशी थरूर () यांच्यसह काही ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांनी सोमवारी रात्री गुलाम नबी आझाद यांच्या निवसस्थानी बैठक घेतली. या बैठकीत मुकुल वासनिक आणि मनीष तिवारी () यांच्यासह सोनिया गांधींना लिहिलेल्या पत्रावर स्वाक्षरी करणारे इतरही काही नेते हजर होते. या बैठकीत काँग्रेस कार्यकारिणी समितीच्या बैठकीनंतरच्या स्थितीवर चर्चा करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. तब्बल ७ तास चाललेल्या काँग्रेस कार्यकारिणी समितीच्या बैठकीत सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचा हात मजबूत करण्याचा सर्वोपरी प्रयत्न केला जाईल असा प्रस्ताव पारित करण्यात आला.

विरोध करणाऱ्या नेत्यांना डावलले?

सोनिया गांधी यांना पत्र लिहिणाऱ्या नेत्यांवर सोनिया गांधी यांचे जवळचे मानले जाणारे काँग्रेसचे नेते अहमद पटेल यांनी निशाणा साधला आहे. या बाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पत्र लिहिणाऱ्या नेत्यांवर सोनिया गांधी अतिशय नाराज आहेत. सोनिया गांधीची पक्षाच्या हंगामी अध्यक्षपदी पुन्हा नियुक्ती केल्यानंतर त्यांचे स्थान पक्षात मजबूत झाले आहे. तर विरोध करणाऱ्या नेत्यांसाठी आता पक्षात स्थिती बिकट झाल्याचे संकेत मिळत आहेत.

क्लिक करा आणि वाचा- सोनिया गांधींना पत्र लिहिणारे कांग्रेस नेते
१ गुलाम नबी आजाद- राज्यसभेतील विरोधी पक्षनेता
२ कपिल सिब्बल – माजी केंद्रीय मंत्री
३ शशी थरूर – तिरुवनंतपुरमचे खासदार
४ मनीष तिवारी – श्री आनंदपुर साहिबचे खासदार
५ आनंद शर्मा – राज्यसभा खासदार
६ पी. जे. कुरियन- पक्षाचे ज्येष्ठ नेते
७ रेणुका चौधरी – माजी केंद्रीय मंत्री
८ मिलिंद देवरा – मुंबई कांग्रेसचे माजी अध्यक्ष
९ मुकुल वासनिक – माजी केंद्रीय मंत्री आणि पक्षाचे जेष्ठ नेते
१० जितिन प्रसाद – माजी केंद्रीय मंत्री
११ भूपेंदर सिंह हुड्डा – हरयाणाचे माजी मुख्यमंत्री, ज्येष्ठ नेते
१२ राजिंदर कौर भट्टल – पंजाबच्या माजी मुख्यमंत्री
१३ एम. वीरप्पा मोइली – माजी केंद्रीय मंत्री
१४ पृथ्वीराज चव्हाण महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री
१५ अजय सिंह – पक्षाचे ज्येष्ठ नेते
१६ राज बब्बर – यूपी कांग्रेसचे माजी अध्यक्ष
१७ अरविंदर सिंह लवली – दिल्लीचे वजनदार नेते
१८ कौल सिंह ठाकूर – हिमाचल कांग्रेसचे माजी अध्यक्ष
१९ अखिलेश प्रसाद सिंह – बिहार निवडणूक प्रचारप्रमुख
२० कुलदीप शर्मा – हरियाणा विधानसभेचे माजी अध्यक्ष
२१ योगानंद शास्त्री – दिल्ली विधानसभेचे माजी अध्यक्ष
२२ संदीप दीक्षित – दिल्लीचे माजी खासदार आणि दिवंगत शीला दीक्षित यांचे पुत्र
२३ विवेक तन्खा – राज्यसभा खासदार

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here