नवी दिल्ली : यांना पुन्हा एकदा पक्षाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर काँग्रेसच्या २३ ज्येष्ठ नेत्यांनी सोमवारी सायंकाळी गुलाम नबी आझाद यांच्या निवासस्थानी एक बैठक घेतली. या बैठकीत कपिल सिब्बल, शशी थरूर, मुकुल वासनिक, मनीष तिवारी अशा अनेक नेत्यांचा समावेश होता. उल्लेखनीय म्हणजे, याच २३ नेत्यांनी सोनियांना संघटनेत बदल सुचवण्यासाठी एक पत्र लिहिलं होतं. या पत्रानंतर पक्षात मोठा भूकंप आला होता. त्यानंतर आज यांच्या नव्या ट्विटनंतर काँग्रेस पक्षात आणखी काही उलथापालथ पाहायला मिळू शकते, असा कयास बांधला जातोय.

‘माझ्यासाठी पद नाही तर देश महत्त्वाचा’ असा संदेश यातून कपिल सिब्बल यांनी या ट्विटमधून दिलाय. त्यानंतर सिब्बल करणार असल्याच्या चर्चांणा उधाण आलंय.

सिब्बल यांनी ‘ते’ ट्विट केलं डिलीट

सोमवारी काँग्रेस कार्यसमितीच्या सकाळी ११ वाजल्यापासून सायंकाळी ६.३० पर्यंत चाललेल्या बैठकीत संतप्त शाब्दिक चकमकी, भावविवशतेच्या प्रतिक्रियाही उमटल्या. संतापाच्या भरात राहुल यांनी पत्र लिहिणाऱ्या नेत्यांवर भाजपशी हातमिळवणी केल्याचा आरोप केल्याचं समजतं. आपली आई आजारी होऊन रुग्णालयात दाखल असताना तसंच मध्य प्रदेश, राजस्थानमध्ये काँग्रेस पक्ष संकटांचा सामना करत असताना हे पत्र लिहिल्याबद्दल राहुल यांनी तीव्र रोष व्यक्त केला. त्यावर गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा आणि मुकुल वासनिक या पत्र लिहिणाऱ्या नेत्यांनी तेवढ्याच आक्रमकपणे प्रतिवाद करत हा आरोप सिद्ध करावा आणि याच बैठकीत आपल्यावर कारवाई करावी, मागणी करीत राहुल यांच्या आरोपांना आव्हान दिल्याची माहिती मिळतेय.

यानंतर कार्यसमितीचे सदस्य नसलेल्या कपिल सिब्बल यांनी करत राहुल यांच्याबद्दल संताप व्यक्त केला. ‘आम्ही भाजपशी हातमिळवणी करत असल्याचं म्हणत आहेत. आम्ही राजस्थान उच्च न्यायालयात काँग्रेसचा बचाव केला. मणिपूरमध्ये भाजप सरकार पाडताना काँग्रेसचा बचाव केला. गेल्या ३० वर्षांत कुठल्याही मुद्द्यावर भाजपला लाभ होईल, असं विधान केलेलं नाही. तरीही आम्ही भाजपशी संगनमत करीत आहोतट, अशी जळजळीत प्रतिक्रिया सिब्बल यांनी ट्विटरवरून व्यक्त केली.

संबंधित बातम्या :

संतप्त सिब्बल यांना राहुल गांधींचा फोन

आपल्या आरोपांचे गांभीर्य लक्षात आल्यानंतर राहुलनी सिब्बल यांना फोन करून माध्यमांमध्ये येत असलेल्या आपल्या विधानांची दखल घेऊ नये, अशी विनंती केली. त्यानंतर सिब्बल यांनी राहुल गांधींचा उल्लेख करीत आपले ट्वीट मागे घेतलं. पत्र लिहिणाऱ्या नेत्यांचा हा आवेश पाहून राहुल यांना आपलं विधान मागे घ्यावं लागलं. राहुल यांनी सिब्बल यांच्याशी व्यक्तिशः संपर्क साधून आपण असं काही बोललो नसल्याचं स्पष्ट केलं. त्यानंतर सिब्बल यांनी आपले केलं.

भाजपच्या चिथावणीवरून सोनियांना पत्र लिहिल्याचा आरोप करणारे विधान राहुल यांनी कार्यसमितीच्या बैठकीत किंवा बैठकीबाहेर केले नसल्याचे गुलाम नबी आझाद यांनी सांगून या वादावर पडदा पाडला. पण राहुल आणि पत्र लिहिणारे नेते यांच्यात या कथित आरोपामुळे चांगलाच कडवटपणा निर्माण झाला.

वाचा :

वाचा :

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here