कॅनबेरा: जगात अनेक विचित्र प्राणी आहेत. त्यापैकी अनेक आपल्याला माहिती आहेत, तर बरेच प्राणी असेही आहेत ज्यांच्याबद्दल आपण फक्त ऐकलं आहे. यापैकीच एक समुद्री प्राणी म्हणजे जलपरी. ऑस्ट्रेलियातील एका समुद्रकिनाऱ्यावर लोकांना चक्क जलपरीचा सांगाडा दिसल्याची माहिती आहे. हा सांगाडा पाहून साऱ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. या सांगाड्यात हाडांचे काही तुकडे हे माणसाच्या हाडांसारखे दिसत आहेत.

समुद्रकिनारी हाडांचा सांगाडा

डेली स्टार न्यूज वेबसाइटच्या वृत्तानुसार, ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँडमधील केपल सँड्स बीचवर लोकांना एका सांगाडा सापडला आहे, हा सांगाडा पाहून अनेकांची भंबेरी उडाली. त्या सांगाड्याचे फोटो समुद्रकिनाऱ्यावर फिरायला गेलेल्या बॉबी-ली ओट्स यांनी काढले आहेत. जेव्हा त्यांनी हाडांची अशी विचित्र संरचना पाहिली तेव्हा पहिल्यांदा त्यांना असं वाटलं की ते एखाद्या माणसाचा कुजलेला मृतदेह आहे. नंतर तो सांगाडा कुठल्या नव्या प्रजातीचा प्राण्याचा असावा असं त्यांच्या लक्षात आलं आणि भलतेच घाबरले.

त्या सांगाड्याचे लांब शरीर दिसते, बरगड्याही दिसतात आणि पाठीचा कणाही दिसतो. मनुष्याच्या कवटीसारखी दिसणारी एक कवटीही दिसते. लोक याला जलपरीचा सांगाडा सांगत आहेत. पण, सध्या याबाबत कुठलीही अधिकृत माहिती वाही. कारण, जलपरी हे एक काल्पनिक पात्र आहे जे चित्रपटांमध्ये पाहिलं जातं.

Murder Mystery: आरी, दोरी अन् व्हॅक्यूम सीलर; कोट्यधीशाची हत्या, तुकडे फ्रीजरमध्ये; पाहून पोलिसही हादरले
बॉबी-ली ओट्स यांनी सांगितले की, या प्राण्याचे शरीर सुमारे ६ फूट लांब आहे. जेव्हा त्यांना हे दृश्य दिसले तेव्हा त्यांचं कुटुंब गाडीत होतं आणि ते लोक कॅम्प साइट शोधत होते. तेवढ्यात त्यांना समुद्रकिनारी काही हाडं दिसली. मानवी हाडं आहेत असं समजून त्यांनी गाडी मध्येच थांबवली आणि ते पाहायला गेले. समोर जे होतं ते पाहून त्यांना धक्काच बसला. या सांगाड्यात एक लांब जबडा असलेली मानवी आकाराची कवटी होती. केसांचा रंग गाय किंवा कंगारुच्या केसांसारखा होता. मृतदेह कुजल्यामुळे अनेक ठिकाणचे केस गळाले होते. या सांगाड्याचा आकार हा जलपरीसारखा होता.

फेसबुकवरील प्रेम ‘लिव्ह इन’पर्यंत आलं, संशयाचं भूत डोक्यात शिरलं, एकाच वादात सगळं संपवलं!

हे पाहून त्यांना धक्काच बसला कारण सुरुवातीला त्यांना हा सांगाडा एखाद्या माणसाचा असावा असंच वाटलं. जेव्हा त्यांनी हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले तेव्हा नेटकऱ्यांनी सांगितलं की हा सांगाडा पाण्यात राहणाऱ्या सस्तन प्राणी जसे डॉल्फिन, व्हेल, ऑर्कास किंवा पोर्पॉइस यांचा असू शकतो.

शेतात काम करताना खजिना सापडला, एका क्षणात त्याच्या आयुष्याचं ‘सोनं’ झालं!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here