नागपूर: करोनाच्या साथीच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या आवाहनानंतर मुख्यमंत्री साहाय्यता निधीत तब्बल ५४१ कोटी रुपयांचा निधी जमा झाला आहे. मात्र, ऑगस्ट महिन्याच्या ३ तारखेपर्यंत त्यातील केवळ १३२ कोटी रुपये खर्च झाले आहेत,’ अशी माहिती समोर आली आहे.

माहिती अधिकार कार्यकर्ते यांनी या संदर्भात अर्ज करून माहिती मागवली होती. कोलारकर यांनी प्रामुख्यानं नागपूर जिल्ह्याशी संबंधित प्रश्न विचारले होते. मुख्यमंत्री कार्यालतील जनसंपर्क अधिकारी मिलिंद कापडी यांनी त्या अर्जाला प्रतिसाद देताना मुख्यमंत्री निधीला मिळालेल्या निधीचा सविस्तर तपशील दिला आहे. त्यानुसार, सुमारे ५४१ कोटी रुपये जमा झाले आहेत. त्यातील १३२.३ कोटी रुपये खर्च झाले आहेत. कोविडशी संबंधित उपाययोजनांसाठी नागपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयाला १.२ कोटी रुपये देण्यात आले आहेत.

वाचा:

मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून मुंबईतील सेंट जॉर्ज हॉस्पिटलला २० कोटी रुपये, रत्नागिरीतील जिल्हा रुग्णालय व जालना जिल्हा रुग्णालयाला प्रत्येकी १.०७ कोटी रुपये देण्यात आले आहेत. जालना येथे रेल्वेखाली चिरडून मृत्यू पावलेल्या १६ मृतांच्या कुटुंबीयांना ८ कोटींची मदत देण्यात आल्याचंही सरकारच्या उत्तरात स्पष्ट करण्यात आलं आहे. नागपूरमधील एखाद्या रुग्णालयास कोविडविरोधी लढ्यासाठी काही मदत देण्यात आली आहे का, असाही प्रश्न माहिती अर्जातून विचारण्याला आला होता. मात्र, तशी कोणतीही मदत देण्यात आली नसल्याचं उत्तरात नमूद करण्यात आलं आहे.

वाचा:

मुख्यमंत्री साहाय्यात निधीला मदत देणाऱ्यांची नावे द्यावीत, अशी मागणीही कोलारकर यांनी केली होती. मात्र, कोविडच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याचं कारण देत देणगीदारांची नावे देण्यास नकार देण्यात आला आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

4 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here