हा ३२ वर्षीय रुग्ण पाथर्डी तालुक्यातील आहे. त्याच्यावर अनेक दिवसांपासून स्थानिक रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. सोमवारी रात्री त्याला अहमदनगर शहरातील सुरभी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तेथे तिसऱ्या मजल्यावरील रुममध्ये उपचार सुरू होते. आज पहाटेच्या सुमारास त्याने खिडकीची काच फोडून खाली उडी मारली. खाली पडून तो गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर त्याच रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याने ही उडी पळून जाण्यासाठी मारली होती की आत्महत्या करण्यासाठी हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तोफखाना पोलिसांना घटेनची माहिती देण्यात आली असून, चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात आले. गंभीर जखमी झालेल्या या तरुणाची प्रकृती चिंताजनक असण्याची माहिती देण्यात आली.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times
I used to be able to find good info from your blog posts.
Thanks for fantastic info I was looking for this info for my mission.
Thank you ever so for you article post.
Like!! Great article post.Really thank you! Really Cool.