बलिया: उत्तर प्रदेशातील जिल्ह्यातील फेफना पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी संध्याकाळी वृत्तवाहिनीच्या पत्रकाराची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. रतन कुमार सिंह (वय ४२) असे त्याचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच, पोलीस तिथे पोहोचले. या हत्याकांडानंतर उत्तर प्रदेशातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

बलियाचे पोलीस अधीक्षक देवेंद्रनाथ यांनी सांगितले की, ‘वाद झाल्यानंतर काही जणांनी पत्रकार रतन सिंह यांची गोळ्या झाडून हत्या केली. पोलीस पथक या घटनेचा तपास करत आहेत.’ पत्रकाराची हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे. मारेकऱ्यांना लवकरच अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. दुसरीकडे, रतन सिंह यांच्या हत्येनंतर पत्रकारांनी कुटुंबीयांसह धरणे धरले आहेत. एनएच ३१ वर त्यांनी धरणे धरले. फेफना पोलीस ठाण्याच्या प्रमुखांना निलंबित करण्यात यावे, अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे. तर पोलीस ठाण्याचे प्रमुख शशिमौली पांडेय यांना पोलीस अधीक्षकांनी निलंबित केले आहे.

आझमगढचे पोलीस महानिरीक्षक सुभाषचंद्र दुबे यांनी सांगितले की, या प्रकरणात तीन प्रमुख आरोपींना अटक करण्यात आली आहे. अन्य आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. रतन सिंह हे पत्रकार होते. मात्र, या घटनेचा पत्रकारितेशी काहीही संबंध नाही. जमिनीच्या वादातून ही घटना घडली आहे.

अशी घडली घटना

सोमवारी एका मुलानं रतन सिंह यांना बोलावून घेतले. तिथे अरविंद सिंह आणि दिनेश सिंह यांच्या नातलगांनी रतन सिंह यांना लाठ्याकाठ्यांनी मारहाण केली. त्यानंतर त्यांच्यावर गोळ्या झाडून हत्या केली. या प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांची चौकशी केली जात आहे. या घटनेचा पत्रकारितेशी काहीही संबंध नाही. वैयक्तिक कारणातून ही हत्या झाल्याचे पोलीस अधीक्षकांनी सांगितले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here