मुंबई: अपेक्षेप्रमाणे मंत्रिपद न मिळाल्याने गेल्या काही दिवसांपासून नाराज असलेले काँग्रेसचे नेते यांची नाराजी अखेर दूर झाली आहे. वडेट्टीवार यांना आता खाते देण्याचा निर्णय काँग्रेस पक्षाने घेतला आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री यांनी वडेट्टीवार यांची नाराजी दूर करण्याचा कसोशीने प्रयत्न केले. थोरात यांनी दिल्लीत जाऊन पक्षश्रेष्ठींची भेट घेत वडेट्टीवार यांच्या नाराजीविषयी चर्चा केली. त्याच वेळी वडेट्टीवार यांना मदत आणि पुनर्वसन खाते देण्याचा निर्णय झाला.

मंत्रिमंडळा विस्तारानंतर वडेट्टीवार यांच्याकडे इतर मागासप्रवर्ग, शैक्षणिक व सामाजिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, खार जमिनी विकास आणि भूकंप आणि पुनर्वसन ही खाती देण्यात आली होती. अपेक्षेप्रमाणे विभाग न मिळाल्याने वडेट्टीवार कमीलीचे नाराज झाले होते. विस्तारानंतर झालेल्या पहिल्या मंत्रिमंडळाच्या बैठकिला गैरहजर राहून वडेट्टीवार यांनी आपली नाराजी प्रकट केली होती. त्यानंतर झालेल्या विशेष अधिवेशनातही वडेट्टीवार फिरकले नाहीत. मात्र, आपण व्यक्तीगत कारणामुळे अधिवेशनाला येऊ शकलो नाही असे वडटे्टीवार यांनी स्पष्ट केले होते.

मी माझ्यासाठी नाराज नव्हतो- वडेट्टीवार
मात्र, मी पक्षावर नाराज नव्हतो, तर आपल्या पक्षाला मिळालेल्या खात्यांबाबत नाराज होतो असे वडेट्टीवार यांचे म्हणणे आहे. वडेट्टीवार यांना आता मिळालेले मदत व पुनर्वसन खात्याचा संबंध ग्रामीण भागाशी येतो. या खात्यांचा थेट संबंध शेतकऱ्यांशी येत असतो. या खात्यामार्फत शेतकऱ्यांना मदत देण्याचं काम होत असून शेतकऱ्यांना मदत करता यावी याचसाठी आपण या खात्यासाठी आग्रही असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here