डोंबिवली : दारु प्यायला पैसे आणि बसण्यासाठी खुर्ची न दिल्याने सुरक्षारक्षकाशी वाद घालत त्याच्या डोक्यात दगड घातल्याची घटना डोंबिवली शहरात घडली आहे. जखमी सुरक्षा रक्षकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे तर हल्लेखोर मद्यपी तरुण हर्षद कुशाळकरला विष्णू नगर पोलिसांनी अटक केली आहे.

डोंबिवली कोपर रोड परिसरात पटेल आर मार्टबाहेर काल रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सुरक्षारक्षकाला ठाण्यातील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं तर आरोपी हर्षदला पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी सुरु केली आहे.

पप्पा मोबाईल घेऊन द्या, वारंवार मागणी करुनही वडिलांचा नकार, मुलाचं धक्कादायक पाऊल
नेमकी घटना काय?

डोंबिवली पश्चिम कोपर रोड परिसरात असलेल्या पटेल आर मार्टमध्ये मुन्नीराम सहानी हे सेक्युरिटी गार्ड आहेत. काल रात्रीच्या सुमारास सहानी कर्तव्यावर असताना पाऊस आला म्हणून दुकानासमोर टेम्पो मध्ये बसले होते. यावेळी हर्षद त्या ठिकाणी आला. त्याने सहानी यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. त्यानंतर वॉचमनसाठी असलेली खुर्ची बसण्यास मागितली.

मात्र सहानी यांनी हर्षदला दारुसाठी पैसे आणि बसण्यासाठी खुर्ची देण्यास नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या हर्षदने शिवीगाळ करत बाजूला पडलेला दगड सहानी यांच्या डोक्यात घातला. त्यानंतर पुन्हा पेव्हर ब्लॉकही डोक्यात घातला. दगड डोक्यात घातल्याने सुरक्षारक्षक गंभीर जखमी झाले. घटनेनंतर हर्षद तिथून निघून गेला.

तरुणीवरील हल्ल्याने पुणे सुन्न! बचावास गेलेले अनेक जण जखमी; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला थरारक अनुभव

तेथील काही माणसांनी सुरक्षरक्षकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. तर या प्रकरणी गुन्हा दाखल करत विष्णू नगर पोलिसांणी हल्लेखोर मद्यपी हर्षद कुशाळकर याला सिद्धार्थ नगर येथून बेड्या ठोकल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here