रत्नागिरी: दापोली-खेड-मंडणगड विधानसभा मतदारसंघाचा पुढचा आमदार हा मनसेचा असेल, हे लक्षात ठेवा. अशा दृष्टीने काम सुरू करा आणि यासाठीच राज ठाकरेंनी खास मंडणगड तालुका अध्यक्ष आणि कार्यकारणीला खास मुंबई भेटीचे आमंत्रणही दिले आहे. लवकरच मार्गदर्शन मेळावा घेतला जाईल. तुम्हाला काम करण्याची पद्धतही समजून दिली जाईल आणि मी पुन्हा दौऱ्यावर मंडणगडला येईन, तेव्हा तुमच्याच कुणाच्या तरी घरी मी जेवणार आहे. मात्र आता मी जेवणार कोणाकडे यावरून भांडू नका, असाही आपुलकीचा सल्ला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंडणगड सभेत दिला आहे.
Raj Thackeray Konkan Visit: कोकण दौऱ्यात राज ठाकरेंच्या भेटीला बालमैत्रीण; डॉ. सुष्मिता म्हणतात, ते नेहमीच…
दरम्यान यावेळी दहा जणांच्या नियुक्त्या या सभेत देण्यात आल्या आहेत. मंडणगड मनसेचे तालुकाध्यक्ष नवज्योतसिंग गौड यांना खास बनवून हा तुम्हाला पंजाबी कुठे वाटतो हा तर मराठीच आहे, असं सांगत त्यांचा खास गौरव केला. पुढच्या वेळेला मी मंडणगडला येईल त्या वेळेला मी कामाचा आढावा घेईन आणि त्यानंतर बोलेन असेही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची त्यांनी खास आठवण काढत जवळ असलेल्या रायगड महाड येथील एक कार्यकर्ता बाळासाहेबांचा खूप जवळचा होता. त्याला ते काका म्हणत असत. त्यांचे गॅरेज होते, अशी आठवण त्यांनी मडंणगड येथील सभेत बोलताना काढली.

मुसळधार पाऊस अन् मनसैनिकांचा ओसंडता उत्साह; दापोलीत राज ठाकरेंचं दणक्यात स्वागत

मंडणगड येथेही खास कार्यक्रम घेऊ, असे सांगत त्यांनी ही जबाबदारी अविनाश जाधव यांच्यावर दिली आहे. ते कामाची आखणी करून देतील. लोकांपर्यंत पोहोचवा की, पुढचा आमदार हा इथला मनसेचा असेल, असे सांगताच उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात साद दिली. महिलांसाठीही खास कार्यक्रम दिला जाईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Ratnagiri News Marathi | रत्नागिरी बातम्या | Ratnagiri Local News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here