अहमदनगर: सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेने लोकसहभागातून ” सुरू केले आहे. तसे महापालिकेला का शक्य होत नाही, असा सवाल भारतीय कम्युनिस्ट पक्षाने मनपा आयुक्तांना केला आहे. यासाठी सरकारकडून दहा कोटी रुपये मागण्यापेक्षा सांगलीचा आदर्श आणि मार्गदर्शन घेऊन काम करावे, असा सल्लाही देण्यात आला आहे.

वाचा:

महापालिकेने लोकसहभागातून कोविड हॉस्पिटल उभारल्याची बातमी ‘महाराष्ट्र टाइम्स’ मध्ये प्रकाशित करण्यात आली. त्याच दिवशी नगरच्या महापौरांनी जिल्हाधिकाऱ्यांना असे हॉस्पिटल उभारण्यासाठी दहा कोटी रुपयांची मागणी केल्याच्या बातम्याही प्रसिद्ध झाल्या. याचे पडसाद नगरमध्ये उमटले आहेत. महापौरांकडून केल्या जाणाऱ्या या मागणीवर काही संघटनांनी टीकाही केली आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे शहर सेक्रेटरी भैरवनाथ वाकळे यांनी मनपा आयुक्त श्रीकांत मायकलवार यांना प्रश्न उपस्थित केला असून मिळालेल्या पैशाचा अपव्यय होण्याची शंकाही उपस्थित केली आहे. मनपाची ही मागणी हस्यास्पद असून करोना संकटात महापालिकेच्या आरोग्य विभागाचा ढिसाळ कारभार उघड झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.

करोना संकटकाळात आरोग्याधिकारी काही दिवस गुन्हा दाखल झाल्याने बेपत्ता होते. आरोग्यविभागाचा कोट्यावधींचा कचराघोटाळा नागरिकांमधे आजही चर्चेचा विषय आहे. मृतदेहांची विटंबना तर रोजच ठरलेली आहे काय असे वाटते. एकूणच या विभागाच्या कारभाराचा पूर्वइतिहास आणि पध्दत पाहिली तर १० कोटी रुपयांचे काय होईल हे चित्र आजच समोर येत आहे. करोनाच्या नावाखाली आरोग्यविभागातील थकीत बिलासाठी या पैशाची उधळपट्टी होऊ शकते. हे दिसते आहे. याशिवाय हॉटेलच्या बिलांपासून प्रतिबंधित क्षेत्रातील उपाययोजांनापर्यंतची अनेक बिले थकीत आहेत. ती देण्यासाठी या पैशांचा उपयोग केला जाऊ शकतो. त्यामुळे हॉस्पिटलच्या नावाने पैसे मागून त्यांचा असा उपयोग होणे योग्य नाही. त्यापेक्षा लोकसभागातून हॉस्पिटलसाठी प्रयत्न करावेत, असेही भाकपने म्हटले आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

4 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here