म.टा. खास प्रतिनिधी, मुंबई

उगम कर (टीडीएस) घोटाळ्यात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) माजी प्राप्तीकर अधिकारी व त्याच्या दोन सहकाऱ्यांना अटक केली आहे. तानाजी मंडल अधिकारी, असे त्याचे नाव असून भूषण पाटील व राजेश शेट्टी, या सहकाऱ्यांचा समावेश आहे. हा एकूण २६३ कोटी रुपयांचा घोटाळा आहे.

ईडीतील सूत्रांनुसार, याप्रकरणी मूळ एफआयआर सीबीआयने दिल्लीत दाखल केला होता. त्याआधारे केलेल्या तपासात तानाजी अधिकारी याच्याकडे त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लॉगिन व टोकन तयार करण्याचे अधिकार होते. त्याआधारे त्याने मुंबईच्या प्राप्तीकर कार्यालयात कर्तव्यावर असताना २६३ कोटी ९५ लाख ३१ हजार ८७० रुपयांचे बनावट टीडीएस तयार केले.

भारतासाठी अभिमानाचा क्षण, चांद्रयान-३ चे यशस्वी उड्डाण; पाहा प्रक्षेपणाचा LIVE व्हिडिओ
पुढे या टीडीएसची रक्कम विविध बँक खात्यांसह मेसर्स एसबी एन्टरप्राइझेसकडे वळती केली. ही कंपनी भूषण पाटील याची आहे. तसेच राजेश शेट्टीच्या नावेदेखील काही रक्कम वळती करण्यात आली. याआधारेच ईडीने या तिघांना अटक केली आहे. या तिघांना विशेष न्यायालयाने २४ जुलैपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे.

Chandrayaan 3: उड्डाणानंतरचा सर्वात भावनिक क्षणाचा Video; आनंदआश्रू, प्रोजेक्ट डायरेक्टरना शब्द सुचेनात, चेअरमन खुर्चीवरून…
दरम्यान या तिघांनी बनावट टीडीएस रक्कमेचा उपयोग करुन लोणावळा, खंडाळा, कर्जत, पुणे व उडुपी येथे जमिनी खरेदी केल्या. पनवेल व मुंबईत फ्लॅट खरेदी केले. तसेच चार आलिशान गाड्यांचीदेखील खरेदी केल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

अरे, मोगलाई आहे का? विधानसभा अध्यक्षांकडून केवळ वेळकाढूपणा; संजय राऊतांची राहुल नार्वेकरांवर टीका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here