म. टा. प्रतिनिधी, मुंबई: माटुंगा ते ठाणे आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी/वांद्रे मार्गावर मध्य रेल्वेने मेगाब्लॉक घोषित केला आहे. राम मंदिर ते बोरिवलीदरम्यान पश्चिम रेल्वेने ब्लॉक घेण्याचा निर्णय घेतला आहे. ब्लॉकमुळे काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार असून काही लोकल फेऱ्या विलंबाने धावणार आहे.

मध्य रेल्वे:

स्थानक – माटुंगा ते ठाणे

मार्ग – अप आणि डाउन धीमा

वेळ – सकाळी ११.०५ ते दुपारी ३.३५

परिणाम – ब्लॉकवेळेत धीम्या मार्गावरील सर्व लोकल फेऱ्या जलद मार्गावर वळविण्यात येणार आहेत. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार असून काही लोकल फेऱ्या २० मिनिटे विलंबाने धावतील.

कारशेडमधून लोकलमध्ये बसणाऱ्यांवर कारवाई, प्रवाशांची रेल्वे अडवली

हार्बर रेल्वे:

स्थानक – सीएसएमटी ते चुनाभट्टी/वांद्रे

मार्ग – अप आणि डाउन

वेळ – सकाळी ११.४० ते दुपारी ४.४०

परिणाम – सीएसएमटी / वडाळा रोड ते वाशी / बेलापूर / पनवेल लोकल आणि सीएसएमटी/वडाळा रोड ते गोरेगाव/वांद्रेदरम्यान धावणाऱ्या लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहे. कुर्ला फलाट क्रमांक आठवरून पनवेलसाठी विशेष लोकल फेऱ्या चालवण्यात येणार आहेत.

पश्चिम रेल्वे:

स्थानक – राम मंदिर ते बोरिवली

मार्ग – अप आणि डाउन जलद

वेळ – सकाळी १० ते दुपारी ३

परिणाम – ब्लॉकवेळेत जलद मार्गावरील लोकल फेऱ्या धीम्या मार्गावर वळविण्यात येणार आहे. काही लोकल फेऱ्या १५ मिनिटे विलंबाने धावणार असून काही फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत. बोरिवली ते गोरेगाव दरम्यान विशेष लोकल फेऱ्या चालवण्यात येणार आहेत.

गणेशभक्तांचा कोकणप्रवास यंदाही खाचखळग्यातून, मुंबई गोवा महामार्ग बनला खड्ड्यांचा राजमार्ग,जागोजागी दुरावस्था

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here