मुंबई: बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यचं कारण शोधण्यासाठी गेल्या पाच दिवसांपासून सीबीआयची टीम कसून तपास करत आहे. सुशांतचा जवळचा मित्र आणि त्याच्या मॅनेजर याची सीबीआयकडून तीन दिवसांपासून चौकशी सुरू असून या चौकशीदरम्यान त्यानं अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. सुशांतची गर्लफ्रेंड हिच्याबद्दलही सिद्धार्थनं सीबीआयला महत्त्वाची माहिती दिली आहे.

रिया आयुष्यात आल्यानंतर सुशांतचं आयुष्य एकमद बदलून गेलं. त्यांचं आयुष्य पूर्वी प्रमाणं राहिलं नव्हतं. त्याच्या आयुष्यातील गोष्टी अचानक बदलू लागल्या होत्या. त्याचं कामावरून लक्ष उडालं होतं. तो कामापेक्षा रियाला प्राधान्य देत होता. तिच्यासोबत जास्तीत जास्त वेळ घालवत होता. पण त्यानंतरही असा काळ आला की, तो पूर्णपणे एकटा पडला होता.

सिद्धार्थ त्याच्या नोकरीसाठी हैदराबादला गेला होता. पण सुशांतनं त्याला फोन केला आणि त्याच्यासोबर राहायला येण्यासाठी विनंती केली. सिद्धार्थ त्याची नोकरी सोडून सुशांतसोबत राहायला आला. सुशांतला बॉलिवूडमधल्या करिअरमध्ये रस राहिला नव्हता. त्याला हे क्षेत्र सोडायचं होतं. त्याला त्याचं स्वत:चं ‘ड्रिम प्रोजेक्ट १५०’साठी काम सुरू करायचं होतं.

सिद्धार्थनं सांगितलं की, यापूर्वी देखील रिया सुशांतला सोडून निघून गेली होती. जानेवारी महिन्यात रिया सुशांतला सोडून गेली होती. परंतु काही दिवसांनी ती पुन्हा आली. तिनं आपण मिळून सुशांतची काळजी घेऊ असं सांगितलं होतं. जानेवारी महिन्यात आम्ही सुशांतची बहिणी नीतू यांच्याघरी गेला होतो. तिथं त्याची तब्येत चांगली होती. तिथं काही दिवस राहिल्यानंतर आम्ही मुंबईत परतलो.त्यानंतर सुशांतची तब्येत काहीशी सुधारली होती. त्यानंतर त्यानं औषधं घेणं बंद केलं. मी त्याला असं करू नको, बजावलं होतं.

एप्रिल महिन्याच्या अखेरीस सुशांतची तब्येत आणखी बिघडली. तेव्हा रिया त्याच्या सोबतच होती. ८ तारखेला रियानं तिची बॅग भरली आणि ती निघून गेली. तिनं मला सुशांतची काळजी घे, असं सांगितलं. रिया घर सोडून जाताना सुशांतनं रियाला मिठी मारली आणि तिला बाय म्हणाला. त्यानंतर काही वेळातच सुशांतची बहिणी मीतू घरी आल्या. त्यानंतरही तो जुन्या गोष्टी आठवून रडायचा, असं सिद्धार्थनं त्याच्या चौकशीत म्हटलं आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. Like!! I blog quite often and I genuinely thank you for your information. The article has truly peaked my interest.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here