मुंबई: विकास निधी वाटपात दुजाभाव होत असल्याचा आरोप करत आपल्याच सरकारविरोधात उपोषणाचा इशारा देणाऱ्या काँग्रेसच्या ११ आमदारांनी अखेर उपोषण मागे घेतले आहे. उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री यांनी आमदार यांना फोन करून समजूत काढल्यावर उपोषण रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.

महाविकास आघाडीतील आमदारांच्या मतदारसंघात निधी वाटप करताना दुजाभाव केला जात असल्याच आरोप जालन्यातील काँग्रेस आमदार गोरंट्याल यांनी केला होता. मतदारसंघात सर्वांनाच काम करायचं आहे. त्यामुळं निधीचे वाटपही समान झाले पाहिजे. मात्र, तसे होत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना झुकते माप दिले जाते, अशी नाराजी गोरंट्याल यांनी व्यक्त केली होती. राज्यातील काँग्रेस नेतृत्वाला याची कल्पना दिल्यानंतरही न्याय न मिळाल्यानं गोरंट्याल यांच्यासह ११ आमदारांनी उपोषणाचा इशारा दिला होता. त्यांचा रोख थेट अजित पवार यांच्यावर होता.

शिवसेनेनंही या मुद्द्यावरून हात झटकले होते. काँग्रेसचे आमदार नाराज असतील तर तो काँग्रेसचा प्रश्न आहे. निधी वाटपाविषयी त्यांचे काही आक्षेप, आरोप असतील तर अजित पवार त्यावर उत्तर देतील, असं दैनिक ‘सामना’च्या आजच्या अग्रलेखात नमूद करण्यात आलं होतं. त्यामुळं अजित पवार यांनाच पुढं यावं लागलं.

अजित पवारांनी आज गोरंट्याल यांना फोन केला व त्यांच्याशी चर्चा केली. ‘दुजाभाव करण्याचा प्रश्न उद्भवत नाही. यापुढे निधीवाटप करताना तुमचा प्राधान्यानं विचार केला जाईल. जालना जिल्ह्यातील विकास कामांसाठीही भरीव निधी दिला जाईल, असं आश्वासन अजित पवारांनी दिलं. त्यावर समाधानी असल्याचं सांगत गोरंट्याल यांनी उपोषण मागे घेत असल्याचे जाहीर केले.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here