सातारा : राज्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. कोयत्याचा वापर करुन दहशत माजवण्याचा प्रकार सुरु झाला आहे. हे प्रकार आता शालेय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले आहेत. सातारा जिल्ह्यात असाच एक धक्कादायक प्रकार घडला आहे. शिक्षकांना तक्रार केल्याच्या रागातून एका खासगी शाळेत शिकत असलेल्या दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांवर त्यांच्याच शाळेतील पंधरा वर्षीय विद्यार्थ्याने कोयत्याने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात दोन विद्यार्थी जखमी झाले आहेत. एकाची प्रकृती गंभीर आहे. हा धक्कादायक प्रकार खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथे घडला.

याबाबत माहिती अशी, खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील एका खासगी शाळेत शिकत असलेले चौदा आणि पंधरा वर्षीय दोन सख्ख्या भावंडांवर त्यांच्याच शाळेतील पंधरा वर्षीय अल्पवयीन विद्यार्थ्याने कोयत्याच्या सहाय्याने जीवघेणा हल्ला केला. ही घटना शाळा सुटल्यानंतर सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास घडली. या हल्ल्यात दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. या धक्कादायक घटनेमुळे शाळा परिसरात खळबळ उडाली आहे. यातील जखमी विद्यार्थ्यांपैकी चौदा वर्षीय विद्यार्थ्याला अधिकच्या उपचारासाठी पुणे येथे हलवण्यात आले आहे, तर पंधरा वर्षीय विद्यार्थ्यावर शिरवळ येथील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.
MSRTC News : बोरिवली एसटी स्टँडचा कायापालट होणार, १६ मजली इमारत, १५ फलाटांची निर्मिती
या घटनेची माहिती मिळताच शिरवळ पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नवनाथ मदने, पोलीस उपनिरीक्षक वृषाली देसाई, सतिश आन्देलवार, अब्दुल बीद्री, पोलीस अंमलदार जितेंद्र शिंदे, दत्तात्रय धायगुडे, तुषार अभंग, सुजित मिंगावडे, भाऊसाहेब दिघे, दिपक पालेपवाड, संजय थोरवे यांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन शिरवळ पोलिसांनी दवाखान्यात दाखल विद्यार्थ्यांकडून हल्लेखोर विद्यार्थ्यांची माहिती घेवून अवघ्या वीस मिनिटात हल्लेखोर संशयितास ताब्यात घेतले. या घटनेची नोंद शिरवळ पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत करण्याचे काम सुरू होते.
एकनाथ शिंदेंच्या शिलेदारानं शड्डू ठोकला, नवनीत राणांचं टेन्शन वाढलं, अमरावतीत केली मोठी घोषणा
दरम्यान, कोयत्याचा वापर करण्याचं लोण शालेय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलं असल्यानं या घटनांचा गांभीर्यानं विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. विद्यार्थ्यांच्या समुपदेशनाची देखील गरज निर्माण झाली आहे.

Rain Updates: पावसाचं कमबॅक, सगळी उणीव भरुन काढणार, हे तीन दिवस राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here