गोदरेज कुटुंबाबद्दल सविस्तर जाणून घ्या
गोदरेज समूहाला मुंबईचे ‘जमीनदार’ असेही म्हणता येईल कारण मुंबईत गोदरेज कुटुंबाची सर्वाधिक जमीनी आहे. गोदरेज अँड बॉयसची मुंबईत तीन हजार ४०० एकरपेक्षा जास्त जमिनी असून यापैकी तीन हजार एकरांहून अधिक जमीन विक्रोळीत आहे, तर उर्वरित भांडुप आणि नाहूरमध्ये असून या समूहाची रिअल इस्टेट फर्म – गोदरेज प्रॉपर्टीज विकास व्यवस्थापन करारांतर्गत हे भूखंड विकसित करत आहे.
गोदरेज कुटुंबात जमिनीवरून वाद
गोदरेज कुटुंबाकडे अनेक उद्योगांमध्ये भागीदारीशिवाय हजारो कोटी रुपयांची जमीन असून भूतकाळात याच जमिनींवरून वाद निर्माण झाला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार कुटुंबाने व्यवसायातील हिस्सेदारी पुनर्संचयित करण्यासाठी अनेक सल्लागार आणि सर्वोच्च कायदा संस्थांना गुंतवले होते. भावांमधील मतभिन्नता यामुळे व्यावसायिक आणि धारण जमिनीवरून कुटुंबात वाद निर्माण झाल्याचे बोलले जायचे.
जमशेद गोदरेज यांचे कुटुंब जमिनीवर जास्त रिअल इस्टेटचा विकास नको व्हावा असे वाटत होते, परंतु आदि आणि नादिर गोदरेज यांच्या कुटुंबांना जमिनीवर भरपूर रिअल इस्टेट विकास हवा होता.
गोदरेज कुटुंबात कोण-कोण
गोदरेज घराण्यात अध्यक्ष आदि गोदरेज आणि त्यांचा भाऊ नादिर, चुलत भाऊ रिशाद, जमशीद आणि स्मिता गोदरेज यांचा समावेश आहे. आदि गोदरेज यांना तान्या, निसाबा आणि पिरोजशा गोदरेज अशी तीन मुले असून नादिर यांना तिन्ही मुले आहेत. तसेच जमशेद यांना रायका आणि नवरोज अशी दोन मुले, तर स्मिताला फ्रेयन आणि निरिका गोदरेज ही दोन मुले आहेत.
आदि आणि नादिर गोदरेज समूहाच्या तीन सूचीबद्ध कंपन्या – गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड, गोदरेज प्रॉपर्टीज आणि गोदरेज ऍग्रोव्हेट नियंत्रित करतात. तर होल्डिंग कंपनी गोदरेज अँड बॉयस कुटुंबातील सर्व सदस्यांच्या मालकीची असून जमशेद गोदरेज कंपनीचे अध्यक्ष आहेत.
शेकडो वर्ष जुना गोदरेज समूह
गोदरेज समूहाचा इतिहास १०० वर्षाहून अधिक काळ जुना आहे. गोदरेज समूहाची सुरूवात एक टाळं बनवणारी कंपनी म्हणून झाली होती. त्यानंतर त्यांनी वनस्पती तेलाचा साबण बनवला. गोदरेज हे भारतातील सर्वात प्रतिष्ठित समूहापैकी असून आता कुटुंबाची चौथी पिढी व्यवसायाची सूत्रे सांभाळत आहे.