सापांसह अंडीही सापडली
आश्चर्यकारक बाब म्हणजे या २४ सापांसह सुमारे ५० ते ६० अंडीही बाहेर काढण्यात आली. घराच्या जिन्याखाली ड्रेसिंग टेबल ठेवण्यात आले होते, ज्याच्या खाली सापांनी आश्रय घेतला होता. शुक्रवारी सायंकाळपासून सुरू झालेल्या सापांचं बचावकार्य हे रात्री उशिरापर्यंत सुरू होतं.
खेळताना मुलांना दिसला साप
घरात लहान मुलं खेळत होती, तेव्हा त्यांच्या जवळून एक साप गेला. सापाला पाहताच मुलं घाबरुन आरडाओरड करु लागली, जोरजोराने रडू लागली. मुलांना आवाज ऐकून आसपासची लोक जमा झाली. त्यानंतर या सापांना बाहेर काढण्यास सुरुवात करण्यात आली.
ड्रेसिंग टेबलच्या खाली साप
स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार, जेव्हा ड्रेसिंग टेबल बाजुला केले तेव्हा त्यातून तीन ते चार कोब्रा बाहेर आले. यानंतर लोकांमध्ये एकच गोंधळ उडाला. त्यानंतर स्थानिक लोकांनी सर्पमित्रांना बोलावलं. माहिती मिळताच सर्पमित्र घटनास्थळी पोहोचले आणि या सांपाची सुटका सुरू केली. बचावकार्य सुरू होताच तेथे उपस्थित असलेले लोक सुन्न झाले. या घरातून एकापाठोपाठ एक २४ साप निघाले. इतकंच नाही तर त्या जागेहून ५० ते ६० अंडीही सापडली आहेत.