: जन्मदात्या आईच्या हत्येप्रकरणी मुंबईमधील कुर्ल्यातील एका व्यक्तीला अटक करण्यात आल्यानंतर तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. आईच्या मृतदेहाचे तीन तुकडे केल्यानंतर या व्यक्तीने धडावेगळं शरीर ३६ तास घरातच ठेवलं असल्याची माहिती समोर आली. यानंतर सोहेल शेख याने शरीराचे तुकडे विविध ठिकाणी फेकून दिले.

३० डिसेंबर रोजी विद्याविहारमध्ये धडावेगळं शरीर असलेला मृतदेह आढळून आला होता. या मृतदेहाची ओळख खैरुनिसा शेख अशी पटवण्यात आली. शिवाय गुडघ्यापासून खालचा भागही या मृतदेहासोबत नव्हता.

घाटकोपर पोलिसांनी या संतापजनक प्रकाराची माहिती दिली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, ‘ केल्यानंतर आरोपी मुलाने पुन्हा दोन वेळा हातोड्याने वार केले आणि मृत्यू झाल्याची खात्री केली. यामुळे घरात मोठ्या प्रमाणात रक्त साचलं होतं. रक्त बाहेर जात होतं म्हणून आरोपीने मृतदेह बाथरुममध्ये आणला. संपूर्ण रक्त वाहून जाईपर्यंत त्याने मृतदेहावर पाणी ओतलं.’

पोलिसांच्या माहितीनुसार, ‘आरोपी मुलाने मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी वेळ लागणार असल्याचं लक्षात येताच, घरातला एसी चालू ठेवला. एसीमध्येच ३६ तास मृतदेह ठेवण्यात आला’.

आरोपी सोहेल २८ डिसेंबरला दारू पिऊन घरी गेला. यानंतर पिण्याची सवय आणि नोकरी नसल्यामुळे आईसोबत त्याचा वाद झाला. सोहेल हा विवाहित होता, पण त्याने पत्नीलाही सोडलं आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, ‘आईच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यापूर्वी या मुलाने पुन्हा एकदा दारू प्यायली. आईच्या हातातील दोन सोन्याच्या बांगड्या काढल्या आणि त्या घाटकोपरमधील सराफाला विकल्या, ज्यातून त्याला ५० हजार रुपये मिळाले. यापैकी २५ हजार रुपये त्याने बारमध्ये काम करणाऱ्या प्रेयसीला दिले. उरलेल्या २५ हजार रुपयांपैकी गहाण ठेवलेली दुचाकी सोडवण्यासाठी २० हजार रुपये दिले. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी दुचाकीचा वापर करण्यात आला.’

पोलीस उपायुक्त अखिलेश सिंग यांच्या मते, आरोपीने अगोदर गुन्ह्याची कबुली देण्यास नकार दिला. पण नंतर काही प्रश्न विचारल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. हत्या करण्यासाठी वापरलेल्या शस्त्रांचा सध्या पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here