रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर नुकतीच सुरू करण्यात आलेल्या वंदे भारत एक्स्प्रेसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. हा प्रतिसाद पाहता आठ डब्यांची असलेली गाडी १६ डब्यांची करावी अशी मागणी रेल्वे प्रशासनाकडे करण्यात आली आहे. जवळपास ९४ टक्के इतका उदंड प्रतिसाद या गाडीला मिळत आहे. राज्यभरात चालवणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेस पैकी गोवा मार्गावर धावणारी वंदे भारत एक्स्प्रेस राज्यात दुसऱ्या स्थानावर आहे. हा प्रतिसाद पाहता या गाडीला आणखी आठ डबे जोडण्याचा निर्णय केंद्रीय रेल्वे बोर्ड घेणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. वंदे भारत एक्स्प्रेसला डबे वाढवण्यासाठीचा मोठा निर्णय हा सर्वस्वी केंद्रीय रेल्वे बोर्डाचा आहे त्यामुळे केंद्रीय रेल्वे मंत्रालय प्रवाशांच्या या मागणीला आता काय प्रतिसाद देते हे पाहणं महत्वाचं आहे.

पूर्णपणे एसी असलेल्या वंदे भारत एक्स्प्रेस मधून होणारा आरामदायी प्रवास लार्जेस्ट विंडो,ऑटो सिस्टम डोअर, मुव्हींग चेअर्स आधी अत्याधुनिक सुविधांमुळे ही गाडी प्रवाशांमध्ये लोकप्रिय ठरली आहे. पुढील काही महिन्याच्या बुकिंगलाही प्रवाशांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. सध्या मान्सून वेळापत्रकानुसार कोकण रेल्वे मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस ही आठवड्यातून तीन दिवस धावत आहे. मान्सून वेळापत्रकानंतर ही गाडी शुक्रवार वगळता दररोज कोकण रेल्वे मार्गावर धावणार आहे. प्रवासी आणिपर्यटकांबरोबरच कोकण ते मुंबई असा अनेकदा प्रवास करणारे अनेक अधिकारी कर्मचारी यांनी वंदे भारत एक्स्प्रेस पसंतीस उतरली आहे
यशस्वीचं जयस्वालचं सर्वात मोठं स्वप्न पूर्ण, एकेकाळी तंबूत रात्र घालवणाऱ्या मुलाने मुंबईत घेतला 5 BHK फ्लॅट

विशेष म्हणजे या गाडीला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सुटल्यावर दादर, पनवेल, ठाणे व रत्नागिरी जिल्ह्यात केवळ खेड आणि रत्नागिरी येथे थांबा देण्यात आला आहे.या दोन्ही स्टेशनवरही या गाडीला मोठा प्रतिसाद मिळत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली येथे या गाडीला थांबा देण्यात आला आहे. गणेशोत्सवाचे बुकिंग या गाडीचे फुल झाले आहे आणि प्रवासी वेटिंग वर आहेत.
Monsoon 2023 : पुण्यात पाऊस कधी सक्रीय होणार, IMD कडून अपडेट, उत्तर भारतात जोरदार बॅटिंग, नवी माहिती समोर
प्रवाशांचा प्रतिसाद पाहता गाडीला डबे वाढवण्याचा निर्णय केंद्रीय रेल्वे बोर्ड घेण्याची शक्यता नाकारता येत नाही, मात्र तूर्तासतरी असा कोणताही प्रस्ताव मध्य रेल्वे किंवा कोकण रेल्वे प्रशासनाकडून केंद्रीय रेल्वे बोर्डाकडे पाठवण्यात आलेला नाही अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

शिंदे सरकारमध्ये नवा भिडू, अधिवेशनात विरोधकांची कसोटी, सत्ताधाऱ्यांची या मुद्यांवर कोंडी करण्याची संधी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here