आयपीएलमध्ये असोसिएट स्पॉन्सर फ्युचर ग्रुप होती. पण काल या कंपनीने आयपीएलची स्पॉन्सरशिप काढून घेतली होती. त्यामुळे आयपीएलला मोठा धक्का बसल्याचे म्हटले जात होते. पण आता आयपीएलसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण ही स्पॉन्सरशिप घेण्यासाठी एका दिवसातच एक कंपनी तयार झाली आहे. या कंपनीने आयपीएलबरोबर तीन वर्षांचा करार केल्याचेही म्हटले जात आहे.

वाचा-

एका स्पर्धेसाठी बरेच स्पॉन्सर असतात. विवो ही कंपनी आयपीएलची मुख्य स्पॉन्सर होती आणि आता ही जागा ड्रीम इलेव्हनने घेतली आहे. पण आयपीएलमध्ये असोसिएट स्पॉन्सर फ्युचर ग्रुप होती. गेल्या पाच वर्षांपासून ही कंपनी आयपीएलबरोबर जोडलेली होती. पण आता अचानक या कंपनीने आयपीएलबरोबरचा आपला करार रद्द केला आहे. आयपीएलनेही आपल्या वेबसाईटवरून या कंपनीचे नाव काढून टाकले आहे.

वाचा-

‘इनसाइडस्‍पोर्ट’ने दिलेल्या वृत्तानुसार आयपीएलसाठी आता एक नवीन असोसिएट स्पॉन्सर मिळाला आहे. आयपीएलच्या मुख्य स्पॉन्सरशिपसाठी एक कंपनी प्रयत्नशील होती. पण या कंपनीला आयपीएलमची मुख्य स्पॉन्सरशिप मिळाली नव्हती. पण आता या कंपनीने आयपीएलची असोसिएट स्पॉन्सरशिप मिळवली आहे. त्याचबरोबर आयपीएलसाठी बीसीसीआयबरोबर तीन वर्षांचा एक करारही केलेला आहे.

वाचा-

कोणत्या कंपनीने घेतली असोसिएट स्पॉन्सरशिपआयपीएलच्या मुख्य स्पॉन्सरशिपसाठी पतंजली, टाटा, जिओ, अनअॅकॅडमी आणि ड्रीम इलेव्हन हे शर्यतीत होते. पण यामध्ये बाजी मारली ती ड्रीम इलेव्हन या कंपनीने. पण आयपीएलची असोसिएट स्पॉन्सरशिप आता अनअॅकॅडमी या कंपनीने मिळवली आहे आणि तीन वर्षांचा करारही केला आहे. असोसिएट स्पॉन्सरशिपसाठी दोन जागा रिक्त होत्या. त्यामधील एक जागा अनअॅकॅडमीने घेतली आहे. आता दुसऱ्या जागेसाठी बीसीसीआय क्रेडिट कार्ड पेमेंट कंपनी क्रेटबरोबर बातचीत करत असल्याचे समजते आहे.

वाचा-

असोसिएट स्पॉन्सर म्हणून फ्युचर ग्रुपने आपला करार अचानक रद्द केला आहे. त्यामुळे बीसीसीआय याबाबत त्यांच्यावर कारवाई करू शकते. त्याचबरोबर त्यांच्याकडून करार मोडल्याप्रकरणी दंडही वसूल केला जाऊ शकतो. पण हा दंड मोठ्या स्वरुपात नसेल.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. Hi there, after reading this amazing paragraph i am as well delighted to share my knowledge here with friends.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here