कोल्हापूर: बेळगाव जिल्ह्यातील येथे शिवाजी महाराजांचा हटवलेला पुतळा आहे त्याच ठिकाणी बसविण्याचं आश्वासन देऊनही सरकारने शब्द पाळला नाही. त्यामुळे आक्रमक झाली असून आंदोलन करण्यासाठी शिवसेनेने बेळगावच्या दिशेने कूच केली आहे. यावेळी दांडी मार्च काढून मनगुत्तीत घुसणार असल्याने बेळगाव जिल्ह्यातील वातावरण तापले आहे.

कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील मनगुत्ती गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटविल्याची घटना घडली होती. त्यामुळे शिवसैनिक प्रचंड आक्रमक झाले होते. या घटनेच्या निषेधाच्या कर्नाटकसह महाराष्ट्रातूनही प्रतिक्रिया उमटल्या होत्या. त्यामुळे वातावरण तापले होते. या पार्श्वभूमीवर अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी आंदोलक आणि स्थानिक प्रशासनामध्ये यशस्वी तोडगा काढला होता. त्यानुसार पंधरा दिवसात मनगुत्ती येथे आहे त्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर आंदोलन थांबले होते. मात्र, पंधरा दिवस उलटून गेल्यानंतरही पुतळा बसविण्यात न आल्याने शिवसैनिक आक्रमक झाले आहेत.

मनगुत्तीत आहे त्या ठिकाणी महाराजांचा पुतळा बसवावा म्हणून कोल्हापुरातील शिवसैनिक बेळगावमध्ये पोहोचले आहेत. हे शिवसैनिक कवळी कट्टी ते मनगुत्तीपर्यंत दांडी मार्च काढून गावात घुसून आंदोलन करणार आहेत. पुतळ्याच्या मुद्द्यावरून शिवसैनिक आक्रमक झाल्याने कर्नाटक प्रशासन हादरून गेले असून मनगुत्ती गावात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच बेळगावच्या सीमेवरही पोलिसांची कुमक वाढवण्यात आली आहे.

वाचा:

काय आहे प्रकरण

बेळगाव जिल्ह्यातील मनगुत्ती गावात तेथील नागरिकांनी बसवलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कर्नाटक सरकारच्या आदेशावरून रातोरात हटवण्यात आला होता. ग्रामपंचायतीच्या परवानगीने मनगुत्ती गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्यात आला होता. हा पुतळा हटवण्यात यावा यासाठी पोलिसांनी दबाव आणला होता. त्याविरोधात मनगुत्ती येथील नागरिक रस्त्यावर उतरले होते. त्यानंतर पोलिसांनी माघार घेतली होती. मात्र, कर्नाटक सरकारनं मनमानी करत हा पुतळा हटवला आहे. या घटनेनंतर महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील शिवभक्तांमध्ये संतापाची लाट पसरली. कोल्हापुरात शिवसेनेने या घटनेविरुद्ध संतप्त निदर्शने केली. यावेळी कर्नाटक सरकारच्या प्रतिमेचे दहन करण्यात आले. कर्नाटक सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा सन्मानाने आहे त्या जागी विराजमान करावा, अन्यथा कर्नाटकात येवून मस्ती जिरवू, असा सज्जड इशारा यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिला होता. त्याचवेळी शिवसैनिकांनी कर्नाटकात घुसून आंदोलन करण्याचा इशाराही दिला. महाराष्ट्रात शिवसेना व भाजप नेत्यांमध्ये जोरदार वाकयुद्धही रंगलं. एकंदर हे प्रकरण चिघळत असल्याचे लक्षात घेऊन कर्नाटकने नमतं घेत शिवरायांचा पुतळा पुन्हा सन्मानाने बसवण्याचा निर्णय घेतला आहे. स्थानिक प्रशासनाने आठ दिवसांत परवानगी देऊन शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा बसवण्याचे आश्वासन गावकऱ्यांना दिले आहे. त्यावर आठ दिवसांत शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला गेला नाही, तर नवव्या दिवशी आम्हीच पुतळा बसवू असेही गावकऱ्यांनी ठणकावले आहे. प्रशासनाशी चर्चा झाल्यानंतर गावकऱ्यांचे आंदोलन तूर्त थांबले होते.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here