मुंबईः रायगडमधील महाड मधील इमारत दुर्घटनाप्रकरणी भाजप आमदार यांनी राज्य सरकारवर पुन्हा निशाणा साधला आहे. या विश्वासघाती सरकारवर जनतेने कसा विश्वास ठेवायचा? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

सोमवारी संध्याकाळी साडे सहाच्या सुमारास महाडमधील तारिक गार्डन ही इमारत पत्त्यासारखी कोसळली. या दुर्घटनेत आत्तापर्यंत पाच जणांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. तर, १५ पेक्षा अधिक जण ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. तर आत्तापर्यंत ८ जणांना वाचवण्यात यश आलं आहे. सरकारने या दुर्घटनेतील पीडितांच्या कुटुंबीयांना मदतही जाहीर केली आहे. यावरूनच आमदार नितेश राणे यांनी सरकारवर टीका केली आहे.

वाचाः

‘रायगडला अजून निसर्ग वादळाची पूर्ण नुकसान भरपाई मिळाली नाही. आता कालच्या इमारतीच्या मदतीची घोषणा या सरकारनी केली आहे. या विश्वासघाती सरकारवर जनतेने विश्वास कसा ठेवायचा?,’ असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, महाड इमारत दुर्घटनेप्रकरणी बिल्डरसह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इमारतीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्यानं इमारत पूर्णपणे ढासळली आहे. संबंधितांवर कठोर कारवाईचे आदेश नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. तर, मृतांच्या कुटुंबीयांना चार लाखांची नुकसानभरपाई देण्यात येणार आहे. अशी माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.

वाचाः

महाड दुर्घटनेची गंभीर दखल घेऊन इमारतीचे बांधकाम करणाऱ्या बिल्डरवर गुन्हा दाखल केला आहे. तसंच, तत्कालीन मुख्याधिकारी, आर्किटेक्चर, नगरपालिका इंजिनीअर आणि आरसीसी कन्सल्टन्स अशा पाच जणांवर कारवाईचा बडगा उचलला आहे. बिल्डरला अटक करण्यासाठी मडाडयेथून पथक रवाना झालं असल्याचं, अशी माहिती समोर येत आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. Like!! I blog quite often and I genuinely thank you for your information. The article has truly peaked my interest.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here