Time Travel: जगात असे अनेक लोक आहेत जे भविष्य सांगण्याचा दावा करतात. काही लोक ग्रह आणि नक्षत्रांच्या हालचालींवरून, तर काही व्यक्तीच्या चेहऱ्याकडे पाहून त्याचं भविष्य सांगण्याचा दावा करतात. तर, काही असेही जे स्वतः टाईम ट्रॅव्हलर करुन भविष्य बघून आल्याचा दावा करतात.

तुम्ही बाबा वेंगा आणि नास्त्रेदेमस यांच्याबद्दल तर ऐकले असेलच. यांनी अनेक वर्षांपूर्वी केलेली भाकीतं अनेकदा खरी ठरली आहेत. मात्र, सध्या अशा एका व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल होतो आहे, जो टाइम ट्रॅव्हलर असल्याचा दावा करत आहे. त्याने दावा केला आहे की तो ६४७ वर्षांनंतरचं जग पाहून परतला आहे. इतकंच नाही तर येत्या ६ महिन्यात माणसाला ती आनंदाची बातमी मिळणार आहे, ज्याची तो अनेक शतकांपासून वाट पाहात आहे.

अखेर एलियन्सच्या घराचा पत्ता सापडला, ‘या’ ग्रहावर आहे वास्तव्य, शास्त्रज्ञांच्या हाती मोठी माहिती
Eno Alaric नावाच्या सोशल मीडिया वापरकर्त्याने @theradianttimetraveller नावाने खाते तयार केले आहे आणि त्याचे २६,००० पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. त्याने आपल्या एका व्हिडिओमध्ये दावा केला आहे की तो वर्ष २६७१ मधून आला आहे. त्याने सांगितले की १३ जानेवारी २०२४ रोजी विज्ञान अमरत्वाचा क्रिस्टल शोधेल. या क्रिस्टलला जो स्पर्श करेल तो अमर होईल.


या क्रिस्टलला स्पर्श केल्यानंतर, सर्व भावना हळूहळू संपतील आणि तुम्हाला दिसेल की या विश्वात कशाचाही अंत नाही. त्याने या क्रिस्टलचा फोटोही शेअर केला आहे. अनेकांनी त्याचा दावा नाकारला, पण त्यावर विश्वास ठेवणाऱ्यांपैकी काहींनी असे होऊ नये असं म्हटले आहे. माणूस अमर होऊ शकत नाही, अशीही प्रतिक्रिया काहींनी दिली आहे.

शेतात काम करताना खजिना सापडला, एका क्षणात त्याच्या आयुष्याचं ‘सोनं’ झालं!
आश्चर्याची बाब म्हणजे या व्यक्तीने तारखांसह आपला अंदाज वर्तवला आहे. इतकंच नाही तर २ एप्रिल २०२४ रोजी ९.८ रिश्टर स्केलचा भूकंप होईल आणि ७५० फूट उंचीचा त्सुनामी येईल. यामुळे कॅलिफोर्निया किनारपट्टीचा मोठा भाग उद्ध्वस्त होईल. एवढेच नाही तर २२ मे २०२४ रोजी एक द्रव्य तयार केलं जाईल, ज्याला फक्त स्पर्श केल्यावर त्यात पडणारी सावली जिवंत होईल. शास्त्रज्ञ या द्रव्याचा तलाव बनवतील ज्याला द ग्रेट मिरर लेक म्हटले जाईल, असाहा दावा त्याने केला आहे.

फेसबुकवरील प्रेम ‘लिव्ह इन’पर्यंत आलं, संशयाचं भूत डोक्यात शिरलं, एकाच वादात सगळं संपवलं!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here