नवी दिल्ली : २०२० च्या न्यायपालिका अवमानना प्रकरणात दोषी ठरलेल्या ज्येष्ठ विधिज्ञ यांच्या शिक्षेवर सर्वोच्च न्यायालयाकडून दिला जाणारा शिक्षेचा निर्णय आज टळलाय. आता या प्रकरणाची सुनावणी १० सप्टेंबर रोजी होणार आहे. ‘मतं मांडण्याचं स्वातंत्र्य’ आणि ‘न्यायालयाचा अवमान’ या दोहींमधला संघर्षावरही मतं ऐकण्याची तयारी सर्वोच्च खंडपीठाननं दाखवलीय.

प्रशांत भूषण यांनी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश तसंच सर्वोच्च न्यायालयावर केलेल्या टिप्पणीबद्दल याअगोदर दोन वेळा नकार दिलेला आहे.

आज झालेल्या, प्रशांत भूषण यांना शिक्षा सुनावण्याच्या मुद्यावर सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारचे प्रतिनिधी अॅटर्नी जनरल के के वेणुगोपाळ यांचं मत विचारात घेतलं. तेव्हा के के वेणुगोपाळ यांनी ‘प्रशांत भूषण यांचं ट्विट न्यायपालिकेत सुधारणेच्या दृष्टीने करण्यात आलं होतं. त्यामुळे प्रशांत भूषण यांना कोणतीही शिक्षा न देता केवळ इशारा देऊन सोडण्यात यावं’ असं म्हटलं. यावर न्यायाधीशांनी ‘प्रशांत भूषण यांचं उत्तर पहिल्यापेक्षाही जास्त अपमानकारक’ असल्याचं म्हटलंय. ‘चूक सगळ्यांकडून होते, परंतु, चूक करणाऱ्याला त्याची जाणीव तरी असायला हवी. आम्ही त्यांना माफी मागण्याची संधी दिली होती परंतु त्यांनी माफी मागणार नसल्याचं म्हटलंय’ असंही न्यायाधीशांनी म्हटलंय

संबंधित बातम्या :

वाचा :

वाचा :

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here