निफ्टीचे पुढील लक्ष्य १९८०० असेल
निफ्टी गेल्या आठवड्यात प्रथमच १९५०० अंकांच्या वर बंद झाला होता, आता ही पातळी अल्पावधीत आधार म्हणून काम करेल. या रॅलीमध्ये येत्या काळात निफ्टी १९८०० पर्यंतची पातळी गाठू शकतो. असे तज्ज्ञांचे मत आहे. महागाई कमी झाल्यानंतर जुलैनंतर फेडरल रिझर्व्ह दरवाढ थांबवेल, असेही मानले जात असून यामुळे जागतिक बाजारपेठेत तेजी असून देशांतर्गत बाजारालाही त्याचा लाभ मिळत आहे. गेल्या चार महिन्यांत परकीय संस्थात्मक गुंतवणुकदारांनी (FII) भारतीय बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर खरेदी करत आहेत.
या घडामोडी बाजारावर करणार परिणाम
डॉलर – रुपयाचा विनिमय दर, कच्च्या तेलाच्या किमती, अनेक कंपन्यांचे निकाल, FII ची पुढील कृती काय आहे आणि जागतिक बाजारपेठ हे सर्व घटक बाजाराच्या चालीवर परिणामकारक ठरू शकतात. सध्या देशांतर्गत बाजार विक्रमी पातळीवर आहेत. आज चीन एप्रिल-जून तिमाहीसाठी जीडीपी आकडेवारी जारी करेल, त्यावरही गुंतवणूकदार आणि तज्ज्ञांचे लक्ष असेल.
भारतीय शेअर बाजारात गेला आठवडा
गेल्या आठवड्यात शुक्रवारी देशांतर्गत बाजाराने नवीन विक्रमी उच्चांक नोंदवला. शुक्रवारच्या व्यवहार सत्रात बीएसईचा ३० शेअर्सचा सेन्सेक्स ७८०.४५ अंक किंवा १.१९% वाढीसह ६६,०६०.९० अंकांच्या नवीन सार्वकालिक उच्चांकावर बंद झाला. दिवसभराच्या व्यवहार दरम्यान निर्देशनाकाने ६६,१५९.७९ अंकांच्या नवीन सर्वकालीन मुसंडी मारली होती. त्याचप्रमाणे नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचा निफ्टी देखील शुक्रवारी १९,५६४.५० अंकांच्या नवीन सार्वकालिक उच्चांकावर बंद झाला.