पुणे : ज्येष्ठ गणितज्ञ, शास्त्रज्ञ आणि लेखिका डॉ. मंगला नारळीकर यांचे निधन झाले. वयाच्या ७९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पुण्यातील राहत्या घरी डॉ. मंगला नारळीकर यांची प्राणज्योत मालवली. अंतराळशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांच्या त्या पत्नी होत.

गेले काही महिने डॉ. मंगला नारळीकर यांना कॅन्सरचा पुन्हा एकदा त्रास सुरू झाला होता. ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांना त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत पत्नी आणि सहकारी म्हणून मंगलाताईंची खंबीर साथ लाभली होती.

पूर्वाश्रमीच्या मंगला राजवाडे यांचा जन्म १७ मे १९४३ रोजी झाला. त्यांनी प्रगत गणितावर काम केले आहे. लहान मुलांना सोप्या भाषेत गणित समजावून सांगण्यात त्यांचा हातखंडा होता.

Ravindra Mahajani Death : रवींद्र महाजनी बुडालेले कर्जात, १५ व्या वर्षी मुलगा गश्मीरने ‘हे’ काम करुन सावरलेलं कुटुंब
डॉ. मंगला नारळीकर यांनी अनेक इंग्रजी व मराठी पुस्तके लिहिलेली आहेत. शालेय विद्यार्थ्यांसाठीचे गणिताच्या सोप्या वाटा, नभात हसरे तारे, पहिलेले देश, भेटलेली माणसं हे प्रवासवर्णन यासारखी त्यांची पुस्तकं विशेष गाजली.

मंगला नारळीकर यांनी मुंबई विद्यापीठतून १९६२ साली बीए ही पदवी घेतली होती. त्यानंतर १९६४ साली त्या एम.ए. (गणित) झाल्या. या परीक्षेत त्यावेळी त्या विद्यापीठातून पहिल्या आल्या होत्या. त्यांना तत्कालीन कुलपतींकडून सुवर्णपदक सुद्धा मिळाले होते.

ना कुटुंबीय, ना शेजारी; रवींद्र महाजनींबाबत बिल्डिंगमधल्या रहिवाशांकडून महत्त्वाची माहिती

१९६४ ते १९६६ या काळात इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेन्टल रिसर्च या मुंबईच्या संस्थेच्या गणित विद्यालयात आधी सहायक संशोधक आणि नंतर सहयोगी संशोधक म्हणून त्यांनी काम केले. १९६७ ते १९६९ मध्ये केंब्रिज विद्यापीठात पदवीपूर्व अभ्यासक्रमाच्या शाळेत त्यांनी गणिताचे अध्यापन केले.

Ravindra Mahajani Death : हवापालटास आले अन् प्राण गेले; रवींद्र महाजनींसोबत फ्लॅट नंबर ३११ मध्ये काय काय घडलं?
१९६५ मध्ये मंगला राजवाडे यांचा विवाह गणिती आणि अंतराळशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांच्याशी झाला. संस्कृत पंडित सुमती नारळीकर या त्यांच्या सासू, तर बनारस हिंदू विद्यापीठातील गणिताचे माजी प्राध्यापक विष्णू वामन नारळीकर हे मंगलाबाईंचे सासरे होत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here