लातूर : जिल्ह्यातील औसा तालुक्यात असणाऱ्या लामजना येथील शेतकऱ्याची मुलगी पीएसआय झाली, अन् साऱ्या गावानं या लेकीच्या यशाचा जल्लोषात आनंद साजरा केला.

साधारण शेतकरी कुटुंबातील या लेकीच नाव आहे शितल राजकुमार चिल्ले. शितलच्या आईचं स्वप्न होतं पोलीस होऊन जनतेची सेवा करायचं. मात्र पाच मुली अन् त्यात वडिलांचं अकाली झालेलं निधन. त्यामुळे त्यांचं लवकरच लग्न झालं अन् पोलीस व्हायचं स्वप्न अधुरं राहिलं. पण आता लेकीन ते स्वप्न पूर्ण केलं अन् त्यांचं मन भरून आलं.

राज्य लोकसेवा परीक्षेची तयारी करणं सोपं नाही. लाखो विद्यार्थी वर्षानुवर्षे तयारी करत आहेत. मात्र, मोजक्याच विद्यार्थ्यांना यश मिळते. तयारी करणाऱ्या मुलांची अनेक वर्ष अभ्यासातच निघून जात असल्याचं दाहक वास्तव मात्र वडिलांना परिचित होतं. त्यामुळे आपल्या मुलीनं कृषी अधिकारी व्हावं. त्या क्षेत्राशी निगडित शिक्षण घ्यावं, अशी वडिलांची इच्छा होती. पण मुलीनं त्यांना विश्वासात घेत यश मिळवलं आणि याचा त्यांना अभिमान वाटतो.
गरीब कुटुंबातून आलेला कार्यकर्ता, अजितदादांचा निष्ठावान, दोनदा मंत्रीपद, कोण आहे संजय बनसोडे?
साधारण शेतकरी कुटुंबातून आलेल्या शितलने लामजना येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षणाचे प्राथमिक धडे घेतले. तर औसा येथील कुमारस्वामी महाविद्यालयात यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून तिनं बीएचं शिक्षण पूर्ण केलं. दरम्यान, तिनं राज्य लोकसेवेच्या परीक्षेची तयारी केली.
आसामची तरुणी प्रियकरासाठी घरदार सोडून लातुरात आली, पण घडलं भलतचं
ग्राउंडची तयारी करत असताना शीतलचा पाय मुरगळला. पायावर सूज आली. त्यामुळे आता आपण ग्राउंडमध्ये जातो की काय अशी भीती तिला वाटू लागली. मात्र काहीही झाले तरी आपण हार मानायची नाही, असा ठाम निर्धार तिने केला. यात तिला भक्कम साथ दिली ती तिच्या आजीने. रोज पायाची वेगवेगळ्या तेलाने मालिश करत राहिल्या. आपल्या नातीला लवकर आराम मिळावा यासाठी त्या प्रयत्न करत राहिल्या. देवाला नवसही बोलू लागल्या. आता नातीच्या यशाने त्या आनंदी झाल्या आहेत.

सुरक्षा रक्षकाचे रुग्णावर उपचार, स्व. विलासराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात धक्कादायक प्रकार

ग्रामीण भागातील अनेक मुलांच्या मनात एक न्यूनगंड असतो की आपण ग्रामीण भागातून आलोत, आपलं शिक्षण जिल्हा परिषद शाळेत झालंय. आपल्या पेक्षा इतर मुले खूप हुशार आहेत. आणि यातून ते स्वतःचं खच्चीकरण करून घेतात. मात्र असा न्यूनगंड न बाळगता मेहनत, जिद्द, अभ्यासातील सातत्य याच्या जोरावर ते नक्कीच यश आपल्या पदरात खेचून आणू शकतात, असा विश्वास शीतल यांना वाटतो. त्यामुळे ग्रामीण भागातील मुलांनी मन लाऊन अभ्यास करावा, असं आवाहन ही शीतलने केलं आहे.

शितलने जिद्द मेहनत अन् चिकाटीच्या जोरावर यश संपादन केलंय. तसंच ग्रामीण भागातील विद्यार्थी आपल्या मेहनतीवर यशाचं शिखर गाठतील, असा विश्वास तिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here