मुंबईः यांच्याकडं जिम उघडण्याची परवानगी देण्याची मागणी केल्यानंतर आता खासदार सुप्रिया सुळेंनी राज्यातील एक पडदा थिएटर सुरु करण्याबाबतही भूमिका घेतली आहे. सिनेमा ओनर्स अँड एक्झिबिटर्स असोसिएशनचे अध्यक्ष व फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष नितीन दातार यांनी सुप्रिया सुळेंनी एक निवेदन दिलं आहे. (Supriya Sule)

राज्यात लॉकडाऊन लागू केल्यानंतर एकपडदा थिएटर्सही बंद आहेत. त्यामुळं थिएटरचालक आर्थिक अडचणीत आले आहेत. ती पुन्हा सुरु करण्यात यावी या मागणीचे निवेदन सिनेमा अँड एक्झिबिटर्स असोसिएशनचे अध्यक्ष व फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष नितीन दातार यांनी दिले आहे. यामध्ये एक पडदा थिएटरचालकांच्या विविध मागण्यांचा समावेश आहे. कृपया एक पडदा थिएटरचालकांच्या मागण्यांवर सहानुभूतीपूर्वक विचार करुन त्यावर सकारात्मक तोडगा काढावा, अशी विनंती यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

दरम्यान, ‘काही दिवसांपूर्वी सुप्रिया सुळे यांनी जिम सुरु करण्यात यावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. व्यायामशाळा अजूनही बंद आहेत. त्यामुळं जिम चालक आर्थिक अडचणीत आले आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडं जिम उघडण्याची परवानगी देण्याची मागणी केली होती. ‘राज्यातील अनेक जीम चालकांनी यामध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. आता अनलॉकची प्रक्रिया सुरू असल्याने जीम पुन्हा सुरू करणे आवश्यक आहे,’ असं त्यांनी म्हटलं होतं.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here