पाटणा: पती-पत्नींमध्ये अनेक कारणास्तव होतो. भांडणं, वाद-विवाद, सतत उडणारे खटके अशी अनेक कारणे असतात. मात्र, पाटणामध्ये घटस्फोटासाठी अजबच कारण समोर आले आहे.

घटस्फोटासाठी सोनी देवी या महिलेने अर्ज दिला आहे. ही महिला वैशाली जिल्ह्यातील देसरी येथील नया गाव येथील रहिवासी आहे. सोनीचा विवाह २०१७ मध्ये मनीष राम याच्यासोबत झाला होता. या दोघांचा विवाह कुटुंबीयांनी लावून दिला होता. आपण नवऱ्याला थेट लग्नाच्या मंडपात पाहिलं असल्याचे सोनी देवीने म्हटले आहे. लग्नानंतर सासरी गेल्यावर पतीच्या वागण्याबाबत आपल्या धक्का बसला असल्याचे सोनी देवीने सांगितले. माझा पती रोज दात घासत नाही. त्यामुळे त्याच्या तोंडातून वास येतो. त्याशिवाय तो दररोज आंघोळ करण्याऐवजी दहा दिवसांनी एकदाच आंघोळ करत असल्याची तक्रार सोनी देवीने केली आहे. पतीला अनेकदा या सवयी सोडण्यास सांगतिले होते. अनेकदा समजावूनही काहीच फरक पडला नसल्यामुळे घटस्फोटासाठी अर्ज दिला असल्याचे सोनी देवीने सांगितले.

महिला आयोगानेही या तक्रारीची दखल घेतली आहे. महिला आयोगातील समुपदेशकांनी या दोघांना घटस्फोटाचा टोकाचा निर्णय न घेण्याचा सल्ला दिला आहे. मनीषने नियमित आंघोळ करावी आणि दात घासावेत असेही समुपदेशकांनी म्हटले आहे. मनीषने स्वत: मध्ये स्वच्छतेबाबत सुधारणा करण्यास सांगितले आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here