विखे यांनी के.के.रेंज प्रश्नावर नगर, पारनेर, राहुरी तालुक्यातील गावांमध्ये जाऊन शेतकऱ्यांच्या बैठका घेतल्या आहेत. या बैठकीमध्ये सोशल डिस्टंसिंग पाळले गेले नसल्याचे समोर आले आहे. तसेच बैठकीला असलेल्या अनेकांनी तोंडाला मास्क लावले नसल्याचेही फोटोमध्ये दिसून आले आहे. या बैठकीचे फोटो सोशल मीडियामध्ये व्हायरल झाल्यानंतर विखे यांच्यावर टीका सुरू झाली होती. मात्र या टीकेला उत्तर देताना विखे यांनी आरोग्यमंत्र्यांसह जिल्ह्यातील सत्ताधारी आमदारांवर देखील गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी आज केली आहे. मात्र, यावर तातडीने लंके यांची प्रतिक्रिया आली आहे. लंके जिल्हाधिकारी कार्यालयात आज आले असता बोलत होते.
‘कोविड सेंटर उदघाटन कार्यक्रमाला आम्ही सोशल डिस्टंसिंग पाळले की नाही, हे त्यांना माहिती नाही. आम्ही सोशल डिस्टन्सिंग पाळत कार्यक्रम केला. राज्याचे आरोग्य मंत्री त्या ठिकाणी येतात, याचे आम्हाला भान होते. त्यामुळे एका तासात तो कार्यक्रम आम्ही उरकला. या कार्यक्रमात शंभर टक्के सोशल डिस्टंसिंग पाळले गेले आहे . त्यामुळे कोणाच्या बोलण्याला काय महत्त्व द्यायचे, हे बाकीच्यांनी ठरवायचे,’ असेही त्यांनी स्पष्ट केले.
‘कार्यक्रमाच्या ठिकाणी आरोग्य विभागाचे कर्मचारी होते. वेगवेगळ्या विभागाचे अधिकारी होते. या सर्वांना ही माहिती आहे, सोशल डिस्टन्सिंग पाळत कार्यक्रम झालाय. मुळात माझी एक सवय आहे, मी काम करणारा माणूस आहे. काम करीत असताना सरकारने ठरवून दिलेले नियम व अटींचे पालन आपण आपल्या पद्धतीने करायचे. कोण काय बोलते ,याला काही महत्त्व देण्यात अर्थ नाही. काम करणार्या माणसांनी इकडे तिकडे लक्ष द्यायचे नसते. त्यामुळे मी त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही. आरोग्यमंत्र्यांनी काय केले, स्थानिक आमदारांनी काय केले , असे बोलणे हा तर रडीचा डाव आहे,’ असा टोलाही त्यांनी लगावला
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times
I love looking through a post that can make people think. Also, many thanks for permitting me to comment!
I like this website very much, Its a very nice office to read and incur information.
A big thank you for your article.
These are actually great ideas in concerning blogging.
Like!! I blog frequently and I really thank you for your content. The article has truly peaked my interest.