अहमदनगर: शिवसेनेचे कोल्हापूरचे खासदार प्राध्यापक यांच्यापाठोपाठ शिर्डीचे शिवसेनेचे खासदार यांच्यासह त्यांची पत्नी व मुलालाही करोनाची लागण झाली आहे. त्यामुळे त्यांना उपचारासाठी मुंबईला आणण्यात येत आहे.

खासदार सदाशिव लोखंडे श्रीरामपूर तालुक्यातील उंबरगाव येथे राहतात. त्यांच्या वाहनचालकाला त्रास जाणवू लागल्याने त्याची करोनाची चाचणी केली असता त्याला करोनाची लागण झाल्याचं निदान झालं. त्यानंतर लोखंडे यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांची आणि चालकाच्या संपर्कात आलेल्यांची रॅपीड टेस्ट करण्यात आली. त्यावेळी लोखंडे आणि त्यांची पत्नी आणि मुलाचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला. तसेच लोखंड यांच्या संपर्कातील आणखी दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले असून पुढील उपचारासाठी त्यांना मुंबईला आणण्यात येत आहे. दरम्यान, लोखंडे गेल्या काही दिवसांपासून मतदारसंघात दौरे करीत होते. अलीकडेच श्रीरामपूर शहरातील एका मोठ्या कार्यक्रमातही ते इतर मान्य नेत्यांसमवेत उपस्थित होते. त्यामुळे आरोग्य यंत्रणा कामाला लागली आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच श्रीरामपूरचे काँग्रेसचे आमदार लहू कानडे यांना आणि त्यांच्या पत्नीला करोनाचा लागण झाली होती. त्यांच्यावरही मुंबईत उपचार करण्यात आले. ते आता ठणठणीत होऊन पुन्हा कामालाही लागले आहेत. तर, शिवसेनेचे कोल्हापूरचे खासदार प्राध्यापक संजय मंडलिक यांना करोनाची लागण झाली आहे. त्यांच्यासह त्यांची पत्नी आणि मुलाचाही करोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यापूर्वी आमदार प्रकाश आवाडे, ऋतुराज पाटील व चंद्रकांत जाधव यांना करोनाची लागण झाली आहे. या तिघांवरही सध्या उपचार सुरू आहेत. त्यातच आता मंडलिक यांना करोनानं गाठलं आहे.

कोविड १९ ची साथ आणि त्यानंतर घेण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात लोकप्रतिनिधी विविध कामांनिमित्तानं मतदारसंघामध्ये फिरत आहेत. बैठका व अन्य जबाबदाऱ्यांमुळं त्यांचा अधिकारी व पोलिसांशी संपर्क येत आहे. त्यातून त्यांना करोनाची लागण होण्याचं प्रमाण वाढलं आहे. आतापर्यंत राज्य सरकारमधील अनेक मंत्र्यांनाही करोनाची लागण झाली आहे. त्याता साताऱ्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, अशोक चव्हाण, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, अस्लम शेख यांचा समावेश आहे. या सर्वांनी करोनावर यशस्वीरित्या मात केली आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here