नवी दिल्लीः देशात १ सप्टेंबरपासून अनलॉक ४ सुरू होत आहे. अशा परिस्थितीत शाळा – महाविद्यालये सुरू करण्याच्या सरकारच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. गृह मंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांपूर्वी मंगळवारी आरोग्य मंत्रालयाने या स्पष्ट केलंय. सुरू करण्याबाबत सरकारकडून कोणत्याही सूचना नाहीत. अनलॉकबाबत गृह मंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये शाळा व महाविद्यालये सुरू करण्याबाबत कोणत्याही सूचना नाहीत, असं आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण म्हणाले.

देशात सध्या जे काही उपक्रम सुरू आहे त्यासाठी आरोग्य मंत्रालय मार्गदर्शक सूचना जारी करतं. जेव्हा शाळा आणि महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय होईल तेव्हा त्या एसओपी लागू होईल आणि ती अंमलात आणावी लागेल, असं सचिव भूषण यांनी सांगितलं.

‘३ कोटीहून अधिक चाचण्या घेतल्या’

देशात आतापर्यंत ३ कोटी ६० लाखाहून अधिक चाचण्या घेण्यात आल्या आहेत. देशातील बरे झालेल्या रूग्णांची संख्या सक्रिय रुग्णांपेक्षा तीन पट जास्त आहे. देशातील लॅबची संख्याही वाढली आहे. यात खासगी आणि सरकारी दोन्ही प्रयोगशाळा आहेत. ज्यामुळे चाचणीची संख्या वाढली आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने देशातील कोरोनाच्या स्थितीबाबत पत्रकार परिषद दिली.

देशातील एकूण रुग्णांपैकी २२.२ टक्के अॅक्टीव्ह रुग्ण आहेत. करोनातून बरे होण्याचे प्रमाण आता ७५ टक्क्यांहून अधिक झाला आहे. देशातील कोरोना मृत्यूचे प्रमाण १.५८ टक्के आहे, जे जगातील सर्वात कमी आहे. तर गेल्या २४ तासांत अॅक्टीव्ह रुग्णांची संख्या ६, ४०० ने कमी झाली आहे. हे प्रथमच झाले आहे, असं आरोग्य मंत्रालयाने सांगितलं.

करोनावरील तीन लशींच्या चाचण्या भारतात सुरू आहेत. सीरम संस्थेच्या लसीचा २ (बी) टप्पा आणि ३ ऱ्या टप्प्याची चाचणी सुरू आहे. भारत बायोटेक आणि झेडस कॅडिला लसीने चाचणीचा पहिला टप्पा पूर्ण केला आहे, अशी माहिती आयसीएमआरचे महासंचालक प्रा. बलाराम भार्गव यांनी दिली.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. Hi there, after reading this amazing paragraph i am as well delighted to share my knowledge here with friends.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here