मुंबई : राज्यात जुलै महिन्याचा पंधरवडा उलटला असून अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढल्याचं चित्र आहे. अशात हवामान खात्याकडून राज्याला पुढचे ५ दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मुंबई, पालघर, पुणे, कोकण, मराठवाडा आणि विदर्भात चांगला पाऊस होईल, अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. याच पार्श्वभूमिवर आजही अनेक जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज आणि येलो अलर्ट देण्यात आला आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई, ठाणे, नवी मुंबईमध्ये पावसाचा जोर वाढणार असून गडचिरोली, चंद्रपूर आणि आजूबाजूच्या काही भागांवर मध्यम ते तीव्र ढग पसरले असून पुढच्या २ तासांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अशात पुढील २ दिवस मध्य भारताच्या काही भागांत जोरदार ते खूप जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकणचा काही भाग, सातारा, पुणे नाशिकचा घाट क्षेत्रात मुसळधार पाऊस होईल. मराठवाड्यातील काही भागांत तुरळक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याची माहिती आहे.

Mumbai Rain Alert: मुंबईकरांसाठी २४ तास महत्त्वाचे, हवामान खात्याकडून या भागांना अतिवृष्टीचा इशारा

कोणत्या भागांत मुसळधार पाऊस?

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज राज्यात मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, धुळे, जळगाव, औरंगाबाद, जालना, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, वाशिम, नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला असून पालघर, पुणे, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या भागांमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे तर इतर महाराष्ट्रामध्ये रिमझिम पावसाच्या सरी बरसतील अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.

अकोल्यात मुसळधार पावसामुळे नागरिकांचे प्रचंड हाल; पुराच्या पाण्यातून जीवघेणा प्रवास

राज्यात आजही तुफान पाऊस

पुढील ४ ते ५ दिवस राज्यात मुसळधार पावासाचा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे. सध्या पश्चिम महाराष्ट्र, कोकण, उत्तर महाराष्ट्र, विदर्भात पाऊस सुरू आहे. तर तळकोकणासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्गात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. आज हवामान विभागाने कोकणासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात यलो अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे राज्यात आजही तुफान पाऊस असेल.

Seema Haider News : सीमा हैदरने अखेर सत्य सांगितलं, चेहऱ्यावर भीतीच नव्हती; १० तासांच्या चौकशीत मोठा उलगडा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here