: उपचाराच्या बहाण्याने बोलावून मारहाण केल्यानंतर डॉक्टरला दोन लाखांची खंडणी मागणाऱ्या तिघांना नंदनवन पोलिसांनी अटक केली आहे. फैजान अली गफ्फार अली (वय २५), अहमद ऊर्फ गोलू रजा खान (वय २२) व अब्दुल खान (वय २४,सर्व रा. हसनबाग),अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. तिघांची एक दिवस पोलिस कोठडी घेण्यात आली. डॉ. अमोल विजय रुडे (वय ४३ रा. व्यंकटेशनगर) यांच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली.

अमोल हे आयुर्वेदिक डॉक्टर असून ते खासगी हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहेत. अमोल हे हसनबागमधील जावेद याच्या पानठेल्यावर नियमितपणे जाताता. दहा महिन्यांपूर्वी त्यांना अहमद भेटला. मला यकृतचा त्रास आहे. औषधोपचार केले. मात्र त्रास कमी झाला नाही, असे त्याने अमोल यांना सांगितले. आयुर्वेदिक उपचार करा, असे तो अमोल यांना म्हणाला. अमोल यांनी त्याच्यावर उपचार सुरू केले. त्याला पथ्यही पाळायला सांगितले. मात्र त्याने पथ्य पाळले नाही. २३ ऑगस्टला रात्री ८ वाजताच्या सुमारास मोहीज नावाचा युवक त्यांच्या घरी आला. अहमद यांची प्रकृती खालावली आहे. तुम्ही त्याला बघायला माझ्यासोबत चला, असे तो अमोल यांना म्हणाला. बळजबरीने त्याने अमोल यांना अहमद याच्या हसनबाग येथील घरी नेले. अहमद याला ऑक्सिजन लावल्याचे अमोल यांना दिसले. अमोल यांनी अहमद याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यास सांगितले.

हॉस्पिटलचा खर्च कोण करणार, असे तो अमोल यांना म्हणाला. त्यानंतर तिघांनी अमोल यांना मारहण केली. त्यांच्याकडील मोपेडची चावी व मोबाइल व रोख हिसकावली. खोलीत डांबून त्यांना मारहाण केली. दोन लाख रुपयांची खंडणी मागितली. पहाटे २ वाजताच्या सुमारास पैसे आणण्यासाठी अमोल यांना सोडले. अमोल घरी गेले. त्यांनी भावाला घटनेची माहिती दिली. अमोल व त्यांच्या भावाने नंदनवन पोलिस स्टेशन गाठून तक्रार दिली. पोलिसांनी खंडणीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक सांदीपन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तिघांना अटक केली. तिघांना न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांची एक दिवसासाठी पोलिस कोठडीत रवानगी केली.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

4 COMMENTS

  1. I learn something new and challenging on blogs I stumbleupon everyday.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here