मुंबई: भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या कथित अश्लील चित्रफिती समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. एका मराठी वृत्तवाहिनीने सोमवारी रात्री यासंदर्भात वृत्त दिले होते. त्यानंतर आज पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस किरीट सोमय्या यांच्या कथित अश्लील क्लिप्समुळे गाजला. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज या प्रकरणी सभागृहात आवाज उठवत किरीट सोमय्या यांच्यावर गंभीर आरोप केले. किरीट सोमय्या यांनी धमकावून किंवा भीती दाखवून काही मराठी भगिनींचे शोषण केल्याचेही आमच्या कानावर आल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केला. एवढेच नव्हे तर अंबादास दानवे यांनी किरीट सोमय्या यांच्या व्हिडीओ क्लिप्स असलेला पेनड्राईव्ह सभापती नीलम गोऱ्हे यांच्याकडे सुपूर्द केला. यानंतर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची घोषणा केली होती.

Kirit Somaiya: आता भाजपच्या चित्रा वाघ कुठे लपल्या? किरीट सोमय्यांच्या व्हिडीओ बाहेर येताच काँग्रेसचा हल्लाबोल

देवेंद्र फडणवीस यांच्या या घोषणेनंतर आता राज्य महिला आयोगही किरीट सोमय्या व्हिडीओ प्रकरणात सक्रिय झाला आहे. यासंदर्भात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी म्हटले की, किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह अवस्थेतील व्हिडीओ प्रसारित झाल्यानंतर अनेक सामाजिक संस्थांनी महिला आयोगाकडे यासंदर्भात विचारणा केली. त्यानंतर महिला आयोगाकडून मुंबईच्या पोलीस आयुक्तांना पत्र पाठवण्यात आले आहे. या प्रकरणाची लवकरात लवकर चौकशी करुन वस्तुस्थिती दर्शक अहवाल सादर करण्याच्या सूचना महिला आयोगाकडून पोलिसांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता मुंबई पोलीस किरीट सोमय्या व्हिडीओ प्रकरणाचा अहवाल कधी सादर करणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. आतापर्यंत महिला आयोग संबंधित महिलांनी तक्रार केल्यास आधारे कारवाई करतो. काही प्रकरणांमध्ये स्युमोटो तत्त्वावर कारवाई केली जाते. त्यामुळे आता मुंबई पोलिसांचा अहवाल आल्यानंतर पुढे काय करायचे, याचा निर्णय घेतला जाईल, असे रुपाली चाकणकर यांनी सांगितले.

Kirit Somaiya Video : बाबा रे सांभाळून राहा… नाथाभाऊंनी किरीट सोमय्यांना दिलेला सल्ला; खडसेंची भीती ठरली खरी!

सोमय्यांच्या व्हिडीओवर देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

किरीट सोमय्या यांच्या आक्षेपार्ह अवस्थेतील काही व्हिडीओ क्लिप्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. यावरुन विरोधकांनी अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले. याबाबत सभागृहात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, सभागृहात मांडण्यात आलेला हा विषय नक्कीच गंभीर आहे. राजकारणात अनेक वेळा असे प्रसंग येतात, ज्यात माणसाचं संपूर्ण राजकीय आयुष्य पणाला लागते, केलेली पुण्याई पणाला लागते. आता जो काही प्रकार समोर आला आहे, त्यासंदर्भात विरोधकांकडे काही तक्रारी असतील तर त्यांनी त्या आमच्याकडे द्याव्यात. आम्ही या सगळ्याची चौकशी करु. विरोधकांनी किरीट सोमय्या व्हिडिओ प्रकरणात त्यांच्याकडे असलेले सबळ पुरावे आमच्याकडे द्यावेत. या सगळ्याची सखोल चौकशी केली जाईल. कोणालाही पाठिशी घातले जाणार नाही. अशाप्रकारचे कुठलेही प्रकरण दाबले किंवा लपवले जाणार नाही, असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिले.या सगळ्याची सखोल आणि वरिष्ठ स्तरावर चौकशी केली जाईल, अशी पुस्तीही देवेंद्र फडणवीस यांनी जोडली.

सोमय्यांच्या व्हायरल व्हिडिओची महिला डॉक्टर, पोलिसांच्या मदतीने तपासणी करु ; नीलम गोऱ्हेंची प्रतिक्रिया

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here