मुंबई : इन्कम टॅक्स रिटर्न (आयटीआर) दाखल करण्याची शेवटची तारीख ३१ जुलै असून अनेकवेळा लोकांच्या मनात हा प्रश्न येतो की एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास आयटीआर भरणे आवश्यक आहे की नाही? मृत व्यक्तीचा आयटीआर दाखल करणे देखील आवश्यक आहे. आता प्रश्न असा आहे की मृत्यूनंतर व्यक्तीचा आयटीआर कोण फाईल करेल आणि त्याची प्रक्रिया काय असेल.

कायदेशीर वारस
मृत व्यक्तीचा आयटीआर दाखल करण्यासाठी सर्वप्रथम त्याच्या नातेवाईकांपैकी एकाला कायदेशीर वारसाची मान्यता घ्यावी लागते. तुम्ही कोर्टाकडून कायदेशीर वारस म्हणून मान्यता घेऊ शकता. पती-पत्नी किंवा मुलगा-मुलगी किंवा इतर कोणीही व्यक्तीचे जवळचे सदस्य न्यायालयाद्वारे कायदेशीर वारस बनवले जातात. स्थानिक महानगरपालिकेकडूनही कायदेशीर वारस मान्यता मिळू शकते.

ITR Filing: करदात्यांसाठी खास माहिती! ITR भरण्याची डेडलाइन आलीये अगदी जवळ, फक्त दोन आठवडे आणि मग…
आयकरकडे नोंदणी
तुम्हाला प्रथम आयकर विभागाच्या वेबसाइटवर जाऊन कायदेशीर वारस म्हणून नोंदणी करावी लागेल. यासाठी न्यायालय किंवा महापालिकेकडून कायदेशीर वारस प्रमाणपत्राची प्रत लागेल. आयकर विभागाच्या वेबसाइट https://www.incometax.gov.in/ ला भेट देऊन ‘My Account’ वर ‘Register as legal heir’ वर क्लिक करावे लागेल आणि कायदेशीर वारस म्हणून स्वतःची नोंदणी करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. यानंतर तुमची कायदेशीर वारस म्हणून नोंदणी झाली आहे की नाही याबाबत काही दिवसांत आयकर विभागाकडून एक सूचना पाठवली जाईल.

ITR Filing 2023: वारस म्हणून मिळालेल्या मालमत्तेवर कर भरावा लागतो का?
खाते कायमचे बंद
मृत व्यक्तीचा आयटीआरही तुम्ही तुमचा आयटीआर भरता त्याच पद्धतीने भरला जाईल. कायदेशीर वारस बनल्यानंतर तुम्ही मृत व्यक्तीच्या खात्यात लॉग इन करू शकाल. मात्र, आयटीआर दाखल केल्यानंतर कर विभाग ते खाते कायमचे बंद करेल. संपूर्ण प्रक्रियेमध्ये तुमच्याकडे मृत व्यक्तीचे मृत्यू प्रमाणपत्र, त्यांचे पॅन कार्ड आणि आधार कार्ड, तुमचे पॅन कार्ड आणि आधार कार्ड तसेच तुम्हाला कायदेशीर वारस बनवण्याचा पुरावा असणे आवश्यक आहे. आयकर रिटर्न भरल्यानंतर रिफंड फक्त मृत व्यक्तीच्या खात्यात येईल. त्या बँक खात्यातून पैसे काढण्यासाठी आणि ते बंद करण्यासाठी तुम्हाला त्यांच्या बँकेशी संपर्क साधावा लागेल.

इनकम टॅक्स रिटर्न भरताना ‘या’ गोष्टी तपासा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here