: महाड येथे काल संध्याकाळी इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांचा आकडा १२वर गेला आहे. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अजूनही ६ जण अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येत असून २४ तासांपासून सुरू असलेलं रेस्क्यू ऑपरेशन अजूनही सुरू आहे. तर, या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना ५ लाख रुपये तर जखमींना ५० हजारांची मदत करण्याची घोषणा मदत आणि पूनर्वसन मंत्री यांनी केली.

महाडच्या काजळपुरा परिसरात काल सायंकाळी सव्वा सहा वाजता तारिक गार्डन नावाची पाच मजली इमारत कोसळली होती. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली ७० ते ८० लोक दबले होते. या घटनेनंतर स्थानिक लोक, अग्निशमन दल आणि एनडीआरएफच्या टीमने युद्धपातळीवर रेस्क्यू ऑपरेशन हाती घेऊन जखमींना ढिगाऱ्याखालून बाहेर काढलं. या इमारतीत एकूण ४१ कुटुंब राहत होते. त्यापैकी १८ कुटुंबांना बाहेर काढण्यात आलं आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत १२ जणांचा दुर्देवी मृत्यू झाला.

१० जेसीबी, ४ पोकलेन आणि १५ डंपरच्या सहाय्याने कालपासून मातीचा ढिगारा उपासण्यात आला. साळुंखे ग्रुप, महाबळेश्वर ट्रेकर्स ग्रुप, ठाणे डिझास्टर मॅनेजमेंट फार्स, कोल्हापूर रेस्क्यू टीम या संस्थांनी या रेस्क्यू कामात मोठी मदत केली. दरम्यान, या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तिंच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत केली जाणार आहे. यामध्ये चार लाख रुपयांची मदत आणि पुनर्वसन खात्यातर्फे तर १ लाख रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून देण्यात देण्यात येणार आहे. जखमींना ५० हजार रुपयांची नुकसान भरपाई दिली जाणार आहे. या घटनेत ज्यांनी आपलं घर गमावलं आहेत त्यांनाही आर्थिक मदत केली जाईल, असं आश्वासन विजय वडेट्टीवार यांनी दिलं आहे. तर खासदार सुनील तटकरे यांनी या दुर्घटनेतील लोकांचं सरकारनं पूनर्वसन करावं, अशी मागणी केली आहे.

इमारत दुर्घटनेतील मृतांची नाव

>> सय्यद अमित समीर

>> नविद झमाने

>> नौसिन नदीम बांगी

>> आदी हाशिम शैकनग

>> अनोळखी महिलेचा मृतदेह सापडला

>> रोशनबी देशमुख

>> ईस्मत हाशिम शैकनक

>> फातिमा अन्सारी

>> अल्लतिमस बल्लारी

>> शौकत आदम अलसूलकर

Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here