१ मार्च ते ३० जून या कालावधीत ३८५२ आरटीआय अर्ज प्राप्त झाले असल्याचे पीएमओने सांगितले. म्हणजेच ४ महिन्यांत, पीएमओला ३८५२ अर्ज प्राप्त झाले. पीएमओकडून दररोज सरासरी ३२ अर्ज प्राप्त झालेत. पीएमओला पीएम केअर फंडावर आरटीआय अंतर्गत किती अर्ज आले? असं विचारण्यात आलं. आपण ज्या स्वरूपात माहिती विचारत आहात ती या कार्यालयात ठेवली जात नाही, असं उत्तर पीएमओकडून देण्यात आलं. ‘इंडिया टुडे’ने हे वृत्त दिलं आहे.
पंतप्रधान कार्यालयाने दाखल केलेल्या सर्व आरटीआयचा डेटा ठेवला आहे. पण पीएम कॅअर्स फंडाशी संबंधित नोंदी ठेवल्या नाहीत. सर्व माहिती अधिकारातील अर्ज हे एका विशिष्ट स्वरूपात घेतले जातात आणि विशिष्ट प्रश्न विचारले जातात.
पीएमओने यापूर्वीही पीएम केअर्स फंडमधील जमा रक्कमेसंदर्भात माहिती देण्यास नकार दिला होता. आरटीआय अंतर्गत, एका आरटीआय कार्यकर्त्याने पीएम केअर्स फंडात जमा केलेल्या रकमेची माहिती विचारली होती. तर ती माहिती देण्यास पीएमओने नकार दिला होता. माहिती अधिकार कायद्यानुसार ही पब्लिक अथॉरिटी नाही, म्हणून ही माहिती दिली जाऊ शकत नाही, असं पीएमओकडून सांगण्यात आलं होतं.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times