मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती पदाचा कार्यभार सांभाळल्यानंतर पहिल्यांदाच न्या. नागपूर खंडपीठात आले. त्यांनी आज येथील वरिष्ठ प्रशासकीय न्यायमूर्ती रवी देशपांडे यांच्यासोबत याचिकांवर सुनावणी केली. तेव्हा मुख्य न्यायमूर्ती दत्ता यांच्या समक्ष काही जनहित याचिका देखील सुनावणीसाठी सादर करण्यात आल्यात.
लॉकडाउनच्या काळात ऑटोचालकांचे आर्थिक नुकसान झाल्याने त्यांना आर्थिक मदत करावी, अशी विनंती करणारी शहरातील एका संघटनेने दाखल केलेली याचिका सुनावणीस सादर झाली. तेव्हा सदर संघटना ही नोंदणीकृत आहे काय, अशी विचारणा संबंधीत वकिलांना मुख्य न्यायमूर्ती दत्ता यांनी केली. तसेच त्या वकिलांना संघटनेचे नोंदणी प्रमाणपत्र पुढील सुनावणीला सादर करण्याचा आदेश दिला. यावेळी खंडपीठासमोर सादर झालेल्या जनहित याचिकांमध्ये याचिकाकर्त्यांचा ” लोकस ” काय आहे, अशी थेट विचारणा मुख्य न्यायमूर्तींनी केली.
उच्च न्यायालयाने जनहित याचिकांबाबत केलेल्या नियमांमध्ये नोंदणीकृत नसलेल्या संघटनांना अथवा संस्थांना जनहित याचिका दाखल करता येत नाहीत, याची आठवण मुख्य न्यायमूर्तींनी एका जनहित याचिकेच्या सुनावणीला करून दिली. अनेकदा केवळ वृत्तपत्रातील बातम्यांचा आधार घेत काही संघटना थेट हायकोर्टात जनहित याचिका दाखल करतात. बहुतांश याचिका या केवळ प्रसिद्धीसाठी असतात, त्यात जनहित नगण्य असते, त्यामुळेच मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांनी दिलेल्या कडक संदेशामुळे भविष्यात केवळ जनतेच्या मुलभूत प्रश्नांनाच घेऊन याचिका दाखल होतील, अशी अपेक्षा वरिष्ठ वकिलांनी व्यक्त केली.
दरम्यान, मुख्य न्यायमूर्तींनी अनेक वकिलांना त्यांनी दाखल केलेल्या याचिकांमध्ये अपुरी माहिती असल्याकडे लक्ष वेधले. वकिलांनी त्यांच्या युक्तिवादात अथवा याचिकांबाबत गंभीर असणे आवश्यक आहे, असे त्यांनी नमूद केले. तेव्हा काही वरिष्ठ वकिलांनी देखील लॉकडाउनमुळे आवश्यक कागदपत्रे जोडता न आल्याचे मान्य करीत याचिका मागे घेत नव्याने याचिका दाखल करण्याची परवानगी मागितली.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times
bookmarked!!, I like your blog!
I always spent my half an hour to read this web site’s articles or reviews daily along with a mug of coffee.
I learn something new and challenging on blogs I stumbleupon everyday.
These are actually great ideas in concerning blogging.
Like!! Really appreciate you sharing this blog post.Really thank you! Keep writing.