नवी दिल्ली: जेएनयूमधील सर्व्हर रुमची तोडफोड केल्याप्रकरणी पोलिसांनी नऊ जणांची ओळख पटवली आहे. त्यात विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षा आइशी घोषसह जेएनयूचा माजी विद्यार्थी चुनचुन कुमार, सुचेता आणि प्रिया रंजन यांचा समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
दिल्ली पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. जेएनयूमध्ये रविवारी रात्री सर्व्हर रूममध्ये हल्ला करण्यात आला होता. त्या हल्ल्यात या विद्यार्थ्यांचा समावेश असल्याचं आढळून आलं आहे. जेएनयूच्या हिंसेबाबत अनेक गैरसमज पसरविण्यात आल्याचं गुन्हे अन्वेषण विभागाचे डीसीपी जॉय टिर्की यांनी म्हटलं आहे. एसएफआय, एआयएसए, एआयएसएफ आणि डिएसएफ आदी विद्यार्थी संघटनांनी विद्यार्थांना नोंदणी करण्यापासून रोखले होते. नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांना धमकावले जात होते, असं टिर्की यांनी म्हटलं आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times