म. टा. विशेष प्रतिनिधी,

करोनावर मात करून बरे झालेल्या रुग्णांसाठी रुग्णालयामध्ये आता ‘पोस्ट कोव्हिड ओपीडी’ सुरू करण्यात येणार आहे. रुग्णालयामधून सात हजारांहून अधिक रुग्ण करोनामुक्त होऊन घरी गेले आहेत. त्यापैकी काही जणांना वेगवेगळ्या प्रकारचे शारीरिक त्रास होत आहेत का, याची चाचपणी मंगळवारपासून सुरू झाली आहे.

रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. बाळकृष्ण अडसूळ यांनी ‘मटा’ला सांगितले, ‘केईएम, लो. टिळक आणि नायर रुग्णालयामध्ये करोनामुक्त झालेल्या रुग्णांसाठी ओपीडी सुरू करण्यात आली. फुफ्फुसामध्ये दाह होत असल्याच्या, थकवा येत असल्याच्या तक्रारी घेऊन येथे रुग्ण येतात. अशा प्रकारचा त्रास सेव्हन हिल्स रुग्णालयातून उपचार घेतलेल्या रुग्णांनाही होतो का, याबाबत रुग्णालयाने एक प्रश्नावली तयार केली आहे. त्यात १७ प्रश्न आहेत. यांतून करोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांची सद्यस्थिती समजेल.’

‘पीपीईची गरज नाही’

‘आयसीएमआर’ने दिलेल्या नव्या निर्देशानुसार आता उपचार करणाऱ्या डॉक्टरांसाठी पूर्ण पीपीई किटची गरज नाही. त्यांनी मास्क आणि ग्लोव्ह्ज घातले तरी, पुरेसे आहे. त्यामुळे फोनवरून विचारणा केलेल्या करोनामुक्त व्यक्तींमध्ये फुफ्फुसाचा दाह किंवा इतर कोणत्याही प्रकारचा शारीरिक त्रास दिसत असल्यास या रुग्णांना सेव्हन हिल्स रुग्णालयामध्ये वैद्यकीय उपचार दिले जाणार आहेत. १ सप्टेंबरपासून या वैद्यकीय सुविधेला सुरुवात होणार आहे. ओपीडीमध्ये पल्मनरी फायब्रोसिस असलेल्या रुग्णांना हा शारीरिक त्रास केव्हापासून होतो, निकटच्या संपर्कातील इतर व्यक्तींना लक्षणे जाणवत आहेत का याचीही विचारणा केली जाणार आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here