पाठवून गणेशभक्तांच्या भावना दुखाविल्याचा पवित्रा घेऊन मास्क न लावता आंदोलन करणाऱ्या ब्राह्मण महासंघाच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरक्षित वावर (फिजिकल डिस्टन्सिंग) न पाळणे, कोणतीही परवानगी न घेता आंदोलन करणे, अशा विविध कलमांखाली हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आनंद कन्हैयालाल दवे (वय ४७, रा. गुरुवार पेठ), नीलेश श्रीकांत जोशी (वय ३९, रा. आनंदनगर, वडगाव), मनोज सदाशिव तारे (वय ४४, रा. कळस), तुषार नंदकुमार निंबर्गी (वय २८, रा. शिवणे), सौरभ मनोहर वैद्य (वय २६, रा. मांजरी), दिलीप सुरेश तांबेकर (वय ५२, रा. कोथरूड) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांची नावे आहेत. पोलिसांच्या आदेशाचा भंग करून तोंडाला मास्क न लावता कोव्हिड १९ साथरोगाचा संसर्ग होईल, असे कृत्य करून आंदोलन केल्यामुळे शिवाजीनगर पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यानंतर सर्वांची जामिनावर सुटका करण्यात आली.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times