नाशिक : राज्यात अपघातांचे सत्र सुरुच आहेत. काही दिवसांपूर्वी नाशिक येथील सप्तश्रृंगी गडावर एसटी बसचा घाटात अपघात झाला होता. या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला होता. तर अनेकजण जखमी झाले होते. याचदरम्यान, महामार्ग पोलीस केंद्र सिन्नर हद्दीतील समृध्दी महामार्गावर मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास एका स्विफ्ट डिझायर कारचा अपघात झाला आहे. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे.
ही कार नागपुर लेनवर नाशिक बाजूकडून शिर्डीच्या दिशेने जात होती. स्विफ्ट डिझायर कार क्र. MH-14 EY-7198 वरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही कार रस्त्यावर असलेल्या दुभाजकावर जावून आदळल्याने हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात कारमधील दोघांचा मृत्यू झाला आहे. चालक हर्षल भोसले आणि श्रीकांत थोरात असं मयत व्यक्तींचं नाव आहे. मयतांपैकी एक पुण्याचा तर एक श्रीरामपूरचा असल्याचं सांगण्यात येत आहे.

दरम्यान, अपघातात मृत झालेल्या दोघांना उपजिल्हा रुग्णालय, सिन्नर येथे पाठवण्यात आले असून अपघातग्रस्त वाहन मुख्य रस्त्यावरुन बाजूला करुन वाहतूक सुरळीत सुरु आहे.