मुंबई : राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस सुरू असून अनेक शहरांना पुराच्या पाण्याने वेढलं आहे. अशात मुंबई-गोवा महामार्गावरील वाशिष्टी ब्रिजवरचा भराव वाहून गेल्याची माहिती आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील वाशिष्ठी नदीवरच्या एका लेंथ वरचा हा भराव होता. तोच वाहून गेल्याने आता मोठा धोका निर्माण झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भराव भरला नाही तर वाशिष्टीच्या पुलाला मोठा धोका आहे. मुंबईकडून गोव्याकडे जाणाऱ्या ब्रिजवरचा हा भराव होता. वाशिष्टीच्या वाढलेल्या पाणी पातळीमुळे काल रात्री भराव वाहून गेला. हा जर वेळीच भरला नाही तर पुराचा मोठा धोका आहे. सतत सुरू असलेल्या पुरामुळे याचा वाहतुकीवरही मोठा परिणाम पहायला मिळत आहे.

सगळंच संपलं! तब्बल ५० घरं ढिगाऱ्याखाली १० फूट गाडली गेली; तरुणांनी सांगितली आँखोदेखी
दरम्यान, कोकणात मंगळवारपासून मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. त्यामुळे कोकणातील पुराचा धोका असलेल्या महार चिपळूण खेड येथील नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे ७.५० मीटर वरून ती सध्या वाहत आहे. तर महाड येथील सावित्री नदीनेही इशारा पातळी ओलांडली असून रायगडमधील पाताळगंगा, कुंडलिका, आंबा नदी या नद्या इशारा पातळीच्या वर आहेत.

खेडची जगबुडी नदी धोक्याच्या पातळी जवळ, प्रशासन अलर्ट मोडवर

महाबळेश्वर प्रतापगड परिसरात रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. कोकणातही पावसाचा जोर अद्याप कायम आहे. हवामान विभागाकडूनही रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. एकंदरीत पावसाचा जोर कायम राहिल्यास महाड आणि खेड पुन्हा एकदा पुराच्या उंबरठ्यावर आहे. चिपळूण शहर परिसरात परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असून चिपळूण प्रशासन सज्ज आहे.

पुणे जिल्ह्यातील ३५५ शाळा दोन दिवस राहणार बंद, घाट भागातील पावसामुळे खबरदारी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here