मुंबई : सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने करोना काळात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय असलेल्या सुजित पाटकर आणि डॉ. किशोर बिसुरे यांना अटक केली आहे. डॉ. बिसुरे हे दहिसरच्या करोना फिल्ड रुग्णालयाचे प्रमुख होते. याच रुग्णालयाला संजीव जयस्वाल यांनी मंजुरी दिली होती. त्यात सुजित पाटकर यांनी मध्यस्थी केल्याचा ईडीला संशय आहे

राजधानी मुंबईत झालेल्या कथित कोव्हिड घोटाळ्याप्रकरणी ईडीने कारवाईचा फास आवळण्यास काही महिन्यांपासूनच सुरुवात केली होती. जून महिन्यात ईडीने एकाच वेळी तब्बल १६ ठिकाणी छापे टाकले होते. तेव्हा सुजित पाटकर यांच्याही घरी ईडीचे पथक धडकले होते. लाइफलाइन रुग्णालय मॅनेजमेंट सर्व्हिसेसचे संचालक म्हणून सुजित पाटकर हे काम पाहात होते. त्यामुळे त्यांच्याशी संबंधित ठिकाणांवर ईडीकडून छापे टाकण्यात आले होते.

करोना काळात रुग्णालय उभारणीत घोटाळा केल्याचा ईडीला संशय आहे. ईडीने मागील महिन्यात छापा टाकलेल्या ठिकाणांमध्ये सांताक्रुझ, मालाड, परळ, वरळी येथील ठिकाणांचा समावेश होता. २४ ऑगस्ट २०२२ च्या एफआयआरच्या आधारे ईडीकडून छापे टाकण्यात आले. पाटकर यांच्यासह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे आणखी एक पदाधिकारी सूरज चव्हाण यांच्याशी संबंधित ठिकाणीही ईडीने छापे टाकले होते.

आम्हाला थोडं तरी वर जाऊ द्या साहेब! गावकऱ्याच्या तोंडून शब्द फुटेना; मुख्यमंत्र्यांकडून धीर

घोटाळ्याचा काय आहे आरोप?

भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी करोना काळात दिलेल्या वेगवेगळ्या कंत्राटांमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. सुजित पाटकर यांनी मुंबईतील वेगवेगळ्या जम्बो करोना केंद्रात जून २०२० ते मार्च २०२२ या कालावधीत वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी काढलेल्या निविदा मिळवण्यासाठी ‘लाइफलाइन रुग्णालय मॅनेजमेंट सर्व्हिसेस’ ही कंपनी स्थापन केली. ही कंपनी आधी अस्तित्वात नसून केवळ कंत्राट मिळवण्यासाठी बनावट कागदपत्रांद्वारे तयार करण्यात आली आहे, असा आरोप सोमय्या यांनी केला होता.

रेल्वे रुळावरच रखडली, ट्रॅकवरून चालताना ४ महिन्यांचं बाळ हातातून निसटलं अन् वाहत्या पाण्यात पडलं

सुजित पाटकर यांच्यासह लाइफलाइन रुग्णालय मॅनेजमेंटचे भागीदार डॉ. हेमंत गुप्ता,संजय शहा आणि राजू साळुंखे यांनी मिळून ३८ कोटी रुपयांचा घोटाळा केला, असा आरोप किरीट सोमय्या यांनी तक्रारीत केला होता. कंपनीकडे वैद्यकीय मनुष्यबळ पुरवण्याचा अनुभव व ज्ञान नसतानाही अनुभव असल्याचं भासवून कंत्राट मिळवल्याचं सोमय्या यांच्या तक्रारीत म्हटले होते. त्यांच्या तक्रारीवरून आझाद मैदान पोलिसांनी याआधीच सुजित पाटकर आणि इतर भागीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here